सिंगल चार्जमध्ये आठवडाभर चालणार 15,600mAh बॅटरी असलेला हा 5G फोन; 23 ऑगस्टला येणार बाजारात 

By सिद्धेश जाधव | Published: July 31, 2021 04:53 PM2021-07-31T16:53:19+5:302021-07-31T16:58:51+5:30

15600mah Battery Phone: Oukitel WP15 5G मधील बॅटरी सिंगल चार्जवर आठवडाभर वापरता येईल. जिथे वीज पोहोचली नाही अश्या ठिकाणी राहणाऱ्या किंवा कामासाठी जाणाऱ्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.  

15600mah battery world first rugged phone oukitel wp15 5g launch on 23 august  | सिंगल चार्जमध्ये आठवडाभर चालणार 15,600mAh बॅटरी असलेला हा 5G फोन; 23 ऑगस्टला येणार बाजारात 

Oukitel WP15 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो

Next
ठळक मुद्देOukitel WP15 5G मधील बॅटरी सिंगल चार्जवर आठवडाभर वापरता येईल. जिथे वीज पोहोचली नाही अश्या ठिकाणी राहणाऱ्या किंवा कामासाठी जाणाऱ्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.  

Oukitel पुढल्या महिन्यात जगातील पहिला 5G रगेड स्मार्टफोन लाँच करणार आहे. Oukitel WP15 नावाने लाँच होणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 15600mAh ची प्रचंड मोठी बॅटरी मिळणार आहे. हा फोन 23 ऑगस्टला बाजारात येईल. Oukitel WP15 5G मधील बॅटरी सिंगल चार्जवर आठवडाभर वापरता येईल. जिथे वीज पोहोचली नाही अश्या ठिकाणी राहणाऱ्या किंवा कामासाठी जाणाऱ्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.  

Oukitel WP15 5G ची किंमत आणि उपलब्धता  

Oukitel WP15 5G स्मार्टफोनची किंमत 399 डॉलर (30,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन AliExpress वर प्री-बुकिंग करता येईल. कंपनीचा हा फोन भारतात लाँच होईल कि नाही हे अजून स्पष्ट झाले नाही.  

Oukitel WP15 चे स्पेसिफिकेशन 

Oukitel WP15 5G रगेड स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसरवर चालतो. तसेच या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते. 

Oukitel WP15 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य Sony सेन्सर आहे, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 0.3 मेगापिक्सलचा वर्च्युल लेन्स देण्यात आली आहे.हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनची खासियत 15,600 एमएएचची दमदार बॅटरी आहे, जी 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.  

हा फोन 5 तासांत फुल चार्ज होतो, असे कंपनीने सांगितले आहे. तसेच ही बॅटरी 1300 तासांचा स्टॅन्डबाय टाइम आणि 90 तासांचा कॉलिंग टाइम देते. हा रगेड फोन असल्यामुळे हा फोन वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह येतो आणि उंचावरून पडल्यावर देखील हा सुरक्षित राहतो. एवढ्या मोठ्या बॅटरीसह येणारा हा पहिलाच रगेड स्मार्टफोन असेल.  

Web Title: 15600mah battery world first rugged phone oukitel wp15 5g launch on 23 august 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.