भारतीय महिला, पुरुष संघाचे जेतेपद; यजमानांचे स्पर्धेवर वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 04:11 AM2019-07-20T04:11:33+5:302019-07-20T04:11:40+5:30

राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला संघानी शुक्रवारी अनुक्रमे इंग्लंड व सिंगापूरवर मात करत जेतेपद पटकावले.

Indian women, men's team title; Hosts dominate the tournament | भारतीय महिला, पुरुष संघाचे जेतेपद; यजमानांचे स्पर्धेवर वर्चस्व

भारतीय महिला, पुरुष संघाचे जेतेपद; यजमानांचे स्पर्धेवर वर्चस्व

Next

कटक : राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला संघानी शुक्रवारी अनुक्रमे इंग्लंड व सिंगापूरवर मात करत जेतेपद पटकावले. भारतीय महिलांनी प्रथमच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. पुरुष गटात भारताने इंग्लंडला ३-२ असे तर महिला संघाने सिंगापूरला ३-० असे पराभूत केले. सिंगापूर महिला संघ १९९७ पासून या स्पर्धेत अजिंंक्य राहिला होता. त्यांनी सलग आठ जेतेपद पटकावले होते.
पुरुषांच्या सामन्यात भारताच्या शरथ कमल व जी. साथियान यांना पराभूत व्हावे लागल्याने भारत ०-२ ने पिछाडीवर पडला होता. मात्र शुक्रवारी २६ वाढदिवस साजरा करणाऱ्या हरमीत देसाई याने तिसºया सामन्यात इंग्लंडच्या डेव्हिड मॅकबेथ याला ४-११, ११-५, ८-११, ११-८, ११-८ असे पराभूत केले. त्यानंतर साथियान याने थॉमस जार्र्विस याला ११-२, ६-११, ११-४, ११-४ असे नमविले. निर्णायक लढतीत शरथ आपला अनुभव पणास लावत सॅम्युअल वॉल्करला १५-१३, १२-१०, ११-६ असा धक्का देत भारताचे जेतेपद निश्चित केले.
महिलांच्या अंतिम सामन्यात अर्चना गिरिश कामथने सिंगापूरच्या टिन-टिनला ८-११, १३-११, ११-९, ११-९ असे पराभूत करुन संघाला आघाडीवर नेले. हुकमी मनिका बत्राने डेनिस पायेटवर ११-६, ११-४, ११-३ अशी मात करुन भारताची आघाडी भक्कम केली. यानंतर मधुरिका पाटकरने एम्ली बोल्टोनला ११-९,११-७,११-६ असे पराभूत करत भारताच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Indian women, men's team title; Hosts dominate the tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.