चोºया रोखण्यासाठी युवकांची गस्त; दिवसा नोकरी.. रात्री मात्र ‘जागते रहो’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 02:05 PM2020-08-11T14:05:11+5:302020-08-11T14:08:48+5:30

सोलापूर अलर्ट; विमानतळ परिसरातील पंचवीस मंडळंही सरसावली

Youth patrols to prevent burglary; Job during the day .. just stay awake at night! | चोºया रोखण्यासाठी युवकांची गस्त; दिवसा नोकरी.. रात्री मात्र ‘जागते रहो’ !

चोºया रोखण्यासाठी युवकांची गस्त; दिवसा नोकरी.. रात्री मात्र ‘जागते रहो’ !

Next
ठळक मुद्देदिवसभरात या सर्वच नगरांमध्ये फेरीवाले, भंगारवाले, साड्या अन् बेडशीट कव्हर विकणारे येत असतातहोटगी रोडवरील विमानतळासमोर हत्तुरे वस्तीत स्वामी विवेकानंद नगर, मल्लिकार्जुन नगर, लक्ष्मी नगर आदी नगरांचा समावेशपोलिसांची वाट न पाहता आपणच गस्त घालून चोरट्यांना हुसकावून लावण्याचा विडा काही नोकरदार आणि महाविद्यालयीन युवकांनी उचलला

सोलापूर : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पाच घरफोड्या... एका महिलेचा गळा दाबून मंगळसूत्र पळवले... दिवसभरात भुरट्या चोºयांचे वाढलेले प्रमाण पाहता २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे शिक्षण घेणारे कार्यकर्ते अन् नोकरदार रात्रीची गस्त घालत कडा पहारा देत आहेत. चोºया रोखण्यासाठी रात्री १२ ते  पहाटे ५ पर्यंत ‘जागते रहो...’चा इशारा देताना ही मंडळी जणू पोलिसांची भूमिका बजावत आहेत.

विमानतळ परिसरातील हत्तुरे वस्तीतील अनेक नगरांमध्ये हे चित्र पाहताना तेथील नागरिक मात्र शांततेची निद्रा घेत असावेत.
होटगी रोडवरील विमानतळासमोर हत्तुरे वस्तीत स्वामी विवेकानंद नगर, मल्लिकार्जुन नगर, लक्ष्मी नगर आदी नगरांचा समावेश आहे. पाच घरफोड्यांमुळे सर्वच नगरांमधील नागरिक भयभीत झाले होते. त्यातच एका महिलेचा गळा दाबून तिचे मंगळसूत्र पळवण्याची घटना इथल्या नागरिकांनी गंभीरतेने घेतली आहे. पोलिसांची वाट न पाहता आपणच गस्त घालून चोरट्यांना हुसकावून लावण्याचा विडा काही नोकरदार आणि महाविद्यालयीन युवकांनी उचलला. 

श्रीधर सोनकटले, संदीप काळे, निखिल छत्रबंद, नागेश बंकूर, सुरेश विरपे, सागर माशाळे, श्रीशैल कलशेट्टी, ओंकार कदम, राजेश मुगळीकर, विशाल सुतार, अमन नन्ना, सुरेश कांबळे यांच्यासह शेकडो नोकरदार, युवक हातात काठ्या घेऊन अन् शिट्ट्या वाजवत पहाटे ५ पर्यंत प्रभावी गस्त घालत आहेत. दोन दिवसांपासून पडणाºया पावसाची तमाही न बाळगता आपली सामाजिक ड्यूटी चोखपणे बजावताना दिसतात. 

दिवसा वावरणाºया फेरीवाल्यांची चौकशी

  • दिवसभरात या सर्वच नगरांमध्ये फेरीवाले, भंगारवाले, साड्या अन् बेडशीट कव्हर विकणारे येत असतात. कोणी विक्रेता कुणाच्याही घरासमोर आला की, त्या भागातील पुरुष मंडळी अथवा युवक त्याची कसून चौकशी करतात. 
  • .संशय आला की, त्याला तेथूनच हुसकावून लावले जाते. जे दिवसाचे सूत्र आहे तेच सूत्र रात्रीची गस्त घालणारे युवक वापरत असतात. 
  • .रात्री कोणी अनोळखी आला की, त्याला कोठून आला? कोणाकडे जायचे आहे? काय काम आहे? आदी प्रश्न विचारून शंकेचे निरसनही करून घेतात.

पोलिसांची गस्त असावी...
हत्तुरे वस्तीतील सर्वच नगरांमध्ये गस्त घालणारे युवक सांगतात, आमच्या या कार्याला पोलिसांचा पाठिंबा आहेच. त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही प्रभावी गस्त घालत असताना चोरीची एकही घटना घडली नाही. 

माझ्या प्रभागातच नोकरदार आणि युवकांची ही गस्त कौतुकास्पद आहे. गस्तीसाठी ७ ते ८ ग्रुप पाडले असून, त्यांना बॅटºयाही देण्यात दिल्या आहेत. पाण्याच्या बाटल्याही जरूर देऊ. या गस्तीला पोलिसांचे चांगलेच सहकार्य आहे.
-वैभव हत्तुरे, नगरसेवक.  

Web Title: Youth patrols to prevent burglary; Job during the day .. just stay awake at night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.