रोहित्राचे काम करताना अचानक वीज प्रवाह सुरू होऊन वायरमनचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:22 AM2021-05-14T04:22:18+5:302021-05-14T04:22:18+5:30

रावगाव येथे गुरुवारी या रोहित्रावर भोसे येथील रहिवासी नितीन पाटील हे काम करत होते. दुपारी २ वाजता लाईट ...

Wireman dies of sudden electric shock while Rohitra is working | रोहित्राचे काम करताना अचानक वीज प्रवाह सुरू होऊन वायरमनचा मृत्यू

रोहित्राचे काम करताना अचानक वीज प्रवाह सुरू होऊन वायरमनचा मृत्यू

Next

रावगाव येथे गुरुवारी या रोहित्रावर भोसे येथील रहिवासी नितीन पाटील हे काम करत होते. दुपारी २ वाजता लाईट येणार होती. आठ दिवसाला लाईटची वेळ बदलते त्यानुसार या आठवड्यात २ वाजता लाईट येणार त्यामुळे पाटील यांचे त्या लाईटचे जोडणीचे काम सुरु होते. परंतु साडे अकराच्या दरम्यान अचानक वीज पुरवठा चालू झाल्याने काम करत असतानाच पोलवरच नितीन पाटील यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी दीडशे ते दोनशे लोक जमा झाले. घटना घडल्यानंतर दोन तास उलटूनही महावितरणचे अधिकारी घटनास्थळी हजर न झाल्याने तेथील नागरिक संतप्त झाले होते.

याप्रसंगी युवा नेते शंभूराजे जगताप यांनी घटनास्थळी जाऊन वीज वितरण कार्यालयाशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांना बोलावून मृतदेह पोलवरून खाली उतरवला. तसेच वायरमन पाटील यांच्या कुटुंबीयांना वीज वितरण कंपनीने तत्काळ मदत करावी अशीही मागणी संतप्त नागरिकांनी केली. याप्रसंगी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.

फोटो : १३ नितीन पाटील,वायरमन

Web Title: Wireman dies of sudden electric shock while Rohitra is working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.