शंभर दिवसांत जे होऊ शकलं नाही; ते आता दहा दिवसांमध्ये कसं करणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 10:54 AM2020-07-13T10:54:35+5:302020-07-13T10:56:54+5:30

संचारबंदीवर तिखट प्रतिक्रिया; हातावर पोट असणाºया लाखो कामगारांचं पोट कसं भरणार ?

Which could not happen in a hundred days; How will they do it in ten days now? | शंभर दिवसांत जे होऊ शकलं नाही; ते आता दहा दिवसांमध्ये कसं करणार ?

शंभर दिवसांत जे होऊ शकलं नाही; ते आता दहा दिवसांमध्ये कसं करणार ?

Next
ठळक मुद्देकोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शहर आणि परिसरातील दोन तालुक्यांमध्ये १६ जुलैच्या रात्रीपासून कडक संचारबंदीया पार्श्वभूमीवर लोकमतने रविवारी शहरातील विविध क्षेत्रातील कामगार, हॉटेल व्यावसायिक, रिक्षा चालक यांच्याशी संवाद साधला.गेल्या तीन महिन्यात जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस, आरोग्य विभागाने केलेल्या कामावर नाराजी व्यक्त

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १०० पेक्षा अधिक दिवसांचा लॉकडाऊन केला. तरीही प्रशासनाला त्यावर नियंत्रण मिळवता आले नाही. आता दहा दिवस पुन्हा लॉकडाऊनमध्ये काय साध्य करणार आहात? या काळात हातावरचे पोट असलेल्या कामगारांसाठी काय करणार आहात, असा सवाल सोलापूरकरांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून उपस्थित केला.

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शहर आणि परिसरातील दोन तालुक्यांमध्ये १६ जुलैच्या रात्रीपासून कडक संचारबंदी जाहीर आली. या पार्श्वभूमीवर लोकमतने रविवारी शहरातील विविध क्षेत्रातील कामगार, हॉटेल व्यावसायिक, रिक्षा चालक यांच्याशी संवाद साधला. त्यांनी लॉकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत केले; मात्र गेल्या तीन महिन्यात जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस, आरोग्य विभागाने केलेल्या कामावर नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटेल का? याबद्दल शंका उपस्थित केली. लॉकडाऊनच्या काळात कामगारांचे हाल होतील, व्यवसायाचे नुकसान होईल. त्याबद्दलही प्रशासनाने विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संचारबंदीमुळे अर्थव्यवस्था थांबेल !
साडेतीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अनलॉक सुरू झाले. यामध्ये व्यापार आणि उद्योग सुरू झाले. कामगार, कारागिरांच्या हाताला काम मिळू लागले. या स्थितीत दहा दिवसांची संचारबंदी लागू झाली तर सर्व अर्थव्यवस्था ठप्प होईल, असे कामगारांनी स्पष्ट केले. 

हॉटेल कामगार, आचारी यांना मागील तीन महिने सांभाळले. आता पुन्हा दहा दिवस बंद राहणार. व्यवसाय विस्कळीत होणार. या सर्व .माणसांना कसे सांभाळणार. परगावी गेलेल्या कामगारांना परवाच आणले होते. आता पुन्हा प्रशासनाने काम बंद ठेवायला सांगितले. हे किती दिवस चालणार. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तुम्ही दुकानांना, हॉटेल व्यवसायाला वेळेत मुभा दिली नाही. तुम्ही चुकीचे धोरण राबविले. वारंवार होणाºया बंदला आम्ही वैतागलो आहोत.
-सीताराम शिकरे,
 हॉटेल व्यावसायिक

मागील तीन महिन्यात प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यात अपयशी ठरले. आता पुन्हा लॉकडाऊन केल्यानंतर कोरोनाला रोखले जाईल याची काय शाश्वती? आज अनेक कामगार उपाशी मरत आहेत. चार-चार महिने कामगार बिनकामाचा कसा काय राहू शकेल. लोक कोरोनामुळे नव्हे तर उपाशी राहिलो म्हणून मरतील. दहा दिवसानंतर पुन्हा लॉकडाऊनचे अस्र उपसू नका.
- नागेश गोटे, 
हॉटेल व्यावसायिक.

हॉटेल बंद करुन मी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. तोंडाला मास्क, हातात मोजे घालूनच भाजी विक्री केली. माझ्यामुळे कुणालाही कोरोनाची लागण झाली नाही. तरीही मी लॉकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत करतो. पण दहा दिवस बंदच्या काळात माझ्या कुटुंबाचे हाल होतील. त्याबद्दल प्रशासन काय करणार आहे? कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने अन्य पर्यायांचा वापर करावा.
- भारत औरंगे, 
भाजी विक्रेते.

मी भाड्याने रिक्षा घेऊन चालवतो. तीन महिने रिक्षा बंद होती. परवा चालू झाली तर दोनच माणसांना घेऊन प्रवास करायला परवानगी दिली. मागच्या तीन महिन्यात कोरोना गेला नाही पण काम बंद असल्याने आमचा जीव जायची वेळ आली होती. आता कुठे व्यवसाय सुरळीत होईल म्हटले तर पुन्हा बंद केला आहे. प्रशासनाने दहा दिवसांत कडक उपाययोजना करुन कोरोनाला रोखले पाहिजे.
-सुहास ढमढेरे, रिक्षा चालक.

उत्तर प्रदेशातील आमच्या मूळगावातून परवाच आम्ही सोलापुरात आलो. आमचे दुसरे कामगार बांधव सोलापूरकडे येण्यासाठी निघाले आहेत. ते पोहोचतील त्यावेळी सर्वकाही बंद झालेले असेल. तीन महिने हे लोक कामाविना राहिले. आता इथे आल्यानंतर त्यांचे हाल होणार आहेत. प्रशासनाने त्यांची उपासमार होऊ नये यासाठी काहीतरी करायला हवे. वारंवार काम बंद ठेवू नका.
मिथीलेश जैस्वाल, बांधकाम कामगार

Web Title: Which could not happen in a hundred days; How will they do it in ten days now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.