माढा पंचायत समिती सभापतीपदी दुसºयांदा विक्रमसिंह शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 02:50 PM2019-12-31T14:50:46+5:302019-12-31T14:51:32+5:30

आमदार बबनराव शिंदे गटाचे वर्चस्व कायम; उपसभापतीपदी धनाजी जवळगे

Vikramsingh Shinde is the second president of the Madha Panchayat Samiti | माढा पंचायत समिती सभापतीपदी दुसºयांदा विक्रमसिंह शिंदे 

माढा पंचायत समिती सभापतीपदी दुसºयांदा विक्रमसिंह शिंदे 

googlenewsNext
ठळक मुद्दे- माढा पंचायत समितीसमोर बबनराव शिंदे गटाचा जल्लोष- निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदारांनी काम पाहिले- निवडीवेळी आमदार बबनराव शिंदे स्वत: उपस्थित होते

सोलापूर : माढा पंचायत समितीच्या सभापतीपदी विक्रमसिंह शिंदे यांची दुसºयांदा बिनविरोध निवड झाली़ याशिवाय उपसभापतीपदी धनाजी जवळगे याची निवड झाली़  निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार राजेश चव्हाण यांनी काम पाहिले.

माढा पंचायत समिती सभापती व उपसभापतीची निवडी पंचायत समिती सभागृहात झाल्या़ पंचायत समितीचे १४ सदस्य हे आमदार बबनराव शिंदे गटाचे असल्याने ही निवड बिनविरोध झाली. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आमदार बबनराव शिंदे स्वत: उपस्थित होते़ निवडीनंतर विजयी जल्लोष करण्यात आला.

Web Title: Vikramsingh Shinde is the second president of the Madha Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.