रातंजनसह वैराग, जामगाव, शेंद्रीत कोरोना बाधित रुग्ण आढळले; बार्शीतील आरोग्य यंत्रणा अलर्ट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 11:05 AM2020-05-31T11:05:03+5:302020-05-31T11:07:56+5:30

बार्शी तालुका अलर्ट; रविवारी सकाळी आढळले बार्शीत ६ पॉझिटिव्ह रुग्ण; प्रतिबंधक क्षेत्र वाढले...!!

Vairag, Jamgaon, Shendrit Corona infected patients were found along with Ratanjan; Health system alert in Barshi ...! | रातंजनसह वैराग, जामगाव, शेंद्रीत कोरोना बाधित रुग्ण आढळले; बार्शीतील आरोग्य यंत्रणा अलर्ट...!

रातंजनसह वैराग, जामगाव, शेंद्रीत कोरोना बाधित रुग्ण आढळले; बार्शीतील आरोग्य यंत्रणा अलर्ट...!

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर ग्रामीण पोलीस संचारबंदी काळात सतर्क

बार्शी : कोविड - १९ च्या अनुषंगाने येथील आरोग्य प्रशासनाने शनिवारी बाधित रुग्णांच्या संपर्कातील एकूण १४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी सोलापूरला पाठविले. शुक्रवारी पाठविलेले २१ स्वॅब पैकी १४ अहवाल शनिवारी रात्री प्राप्त झाले ते सर्व १४ अहवाल निगेटिव्ह होते. मात्र आज रविवारी सकाळी २१ पैकी प्रलंबित असलेल्या ७ जणांचे अहवाल रिपोर्ट आले असून त्यातील  सहा जणांचे अहवाल 'कोरोना' पॉझिटिव्ह आले आहेत.  शनिवारचे १४ अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड यांनी याबाबतची माहिती दिली. 

बार्शी तालुक्यात वैराग, जामगांव आ, पाठोपाठ शेंद्री येथे रूग्ण सापडले. नंतर यात जामगांव आ मध्ये तीन रूग्णांची वाढ झाली. त्यामुळे बाधित रूग्णांची संख्या ६ वर पोहोचली होती. जामगांव आ येथील सुरूवातीचा एक रूग्ण मृत असून ५ जणांवर उपचार सुरू आहेत. 

रविवारी सकाळी आलेल्या अहवालात शेंद्री येथील पॉझिटिव्ह असलेल्या रुणाच्या संपर्कातील चार, जामगावच्या रुग्णाच्या संपर्कातील एक तर पुण्याहून रातंजन आलेली व गावातील क्वारन्टाईन सेंटरमध्ये दाखल असलेली एक मुलगी जिचा स्वॅब खाजगी हॉस्पिटलमधून पाठवला होता. ती ही पॉझिटिव्ह आली आहे.

शुक्रवारी पाठविलेल्या जामगांवच्या ४ पैकी ३, वैराग ६ पैकी ५, खाजगी हॉस्पीटल- १ पैकी १, शेंद्री ७ पैकी २, बार्शी २ पैकी २, उक्कडगांव १ पैकी १ असे २१ पैकी १४ अहवाल प्राप्त झाले असून सर्व १४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारचे ७ अहवाल प्रलंबित होते, त्यातील सहा पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आला आहे.  शनिवारी पुन्हा जामगांव आ येथील ७ तर बार्शी शहरातील ७ अशा १४ जणांचे स्वॅब पाठविण्यात आले आहेत.  हे सर्व अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: Vairag, Jamgaon, Shendrit Corona infected patients were found along with Ratanjan; Health system alert in Barshi ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.