तीन महिन्यात सव्वा दाेन लाख लोकांना लस; ८ लाखाचे उदिष्ठ केव्हा पार होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 01:12 PM2021-04-20T13:12:02+5:302021-04-20T13:12:08+5:30

लसीकरण संथ गतीने: नव्याने दीड महिन्याचे केले नियोजन

Vaccinate 1.5 million people in three months; When will the target of Rs 8 lakh be achieved? | तीन महिन्यात सव्वा दाेन लाख लोकांना लस; ८ लाखाचे उदिष्ठ केव्हा पार होणार ?

तीन महिन्यात सव्वा दाेन लाख लोकांना लस; ८ लाखाचे उदिष्ठ केव्हा पार होणार ?

Next

सोलापूर: कोरोना प्रतिबंधक लस जिल्हयातील १० लाख लोकांना देण्याचे उदिष्ट असताना तीन महिन्यात केवळ सव्वा दोन लाख लोकांना डोस देण्यात आला आहे. हीच गती राहिली तर उदिष्ट साध्य करण्यासाठी आणखी एक वर्ष लसीकरण सत्र ठेवावे लागणार असे चित्र दिसत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. पण शासनाकडून लसीचे डोस पुरेशा प्रमाणात उबलब्ध होत नसल्याने दरराेज उदिष्ठाइतके लसीकरण होताना दिसून येत नाही. १६ जानेवारीला सोलापुरात लसीकरणाला सुरूवात झाली. आत्तापर्यंत २ लाख ६२हजार ५३० कोवीशील्डचे तर २ हजार ३२० कोव्हॅक्सीनचे डोस उबलब्ध झाले आहेत. यातून १८ एप्रीलअखेर२ लाख २२ हजार ३२ जणांना पहिला तर ३४ हजार ४०४ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. वास्तविक या काळात ३ लाख ८९ हजार ५०० जणांना लसीकरण होणे अपेक्षीत होते. पहिल्या महिनाभरात लोकांचा प्रतिसाद कमी व त्यानंतर केंद्र कमी असल्याने लसीकरण कमी झाले. आता केंद्र वाढविण्यात आली पण लसीचा पुरवठा कमी होत आहे. या कारणांमुळे लसीकरण रेंगाळत चालले आहे. नव्या नियोजनात २४५ लसीकरण केंद्र ठरविण्यात आली आहेत, पण उपलब्ध डोसनुसार १२८ केंद्रावरच लसीकरण सुरू आहे.

१० लाख ९४ हजार लाभार्थी

शासनाच्या मोफत लसीकरणाच्या धोरणनुसार ग्रामीणच्या ३६ लाख ४८ हजार लोकसंख्येपैकी १० लाख ९४ हजार ५०० इतके लाभार्थी आहेत. याशिवाय सोलापूर महापालिका क्षेत्रातील लाभार्थी वेगळे आहेत. ७ नागरी व १५ खाजगी रुग्णालयामार्फत लसीकरण सुरू आहे. शासनाने पहिल्यांदा आरोग्य व नंतर फ्रंटलाईन वर्कर, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील सर्व व्यक्तींना परवानगी दिली. यामुळे लाभार्थींची संख्या वाढत गेली.

४५ दिवसात लसीकरण संपविणार

उर्वरीत ८ लाख लोकांना ४५ दिवसात लस देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांनी सांगितले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्या उपस्थितीत रविवारी आढावा बैठक झाली. आरोग्य विभागाने जर भरपूर डोस उपलब्ध करून दिल्यास दररोज १५ हजाराप्रमाणे लसीकरण करून कमी कालावधीत उदिष्ठ साध्य करण्याचे ठरविले आहे.

असे झाले तालुकानिहाय लसीकरण

  • अक्कलकोट: १३६१६
  • बार्शी: २४७२०
  • करमाळा: ९२५१
  • मंगळवेढा: ८२००
  • सांगोला: १०४७१
  • पंढरपूर: १६०७५
  • द.सोलापूर: ११८६३
  • उ.सोलापूर: ४९९५
  • माढा: १६२६७
  • मोहोळ: ९६६८
  • माळशिरस: २४७१६
  • सोलापूर शहर:७०५१८

Web Title: Vaccinate 1.5 million people in three months; When will the target of Rs 8 lakh be achieved?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.