आगळगावजवळ दुचाकीचा अपघात; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 11:34 AM2020-11-11T11:34:56+5:302020-11-11T11:35:00+5:30

मोटारसायकल स्लीप झाल्याने घडला अपघात; जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू

Two-wheeler accident near Agalgaon; Death of husband who went shopping for Diwali, wife serious | आगळगावजवळ दुचाकीचा अपघात; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

आगळगावजवळ दुचाकीचा अपघात; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

Next

कुसळंब : पती-पत्नी मोटार सायकल वर जात असताना रस्त्याच्या कडेला अज्ञात वाहन उभे असल्याचे दिसल्याने अचानक वळविताना मोटारसायकल स्लीप झाल्याने खाली पडून पतीस डोक्याला जबर मार लागून ते जागीच ठार झाले व पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना १० नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी आठच्या वाजण्याच्या सुमारास बार्शी - भूम रोडवर आगळगावपासून एक किलोमीटर अंतरावर राजगड हॉटेलच्या पुढे घडली.

   मयताचे नाव दगडू येदा जाधवर (वय 60 रा. बोरगाव ता बार्शी जि) सोलापूर असे आहे.  याबाबत मिळालेली माहिती अशी की, दगडू जाधवर व त्यांची पत्नी निर्मला जाधवर दिनांक 10 नोव्हेंबर  2020 रोजी सहा वाजण्याच्या सुमारास बोरगाव येथून मोटरसायकल नंबर एमएच १३ बीसी ५९८२  या स्वतःच्या मोटारसायकलवर आगळगाव येथून बाजार आणण्यासाठी गेले होते.

बाजार घेऊन परत गावाकडे येत असताना आगळगावपासून एक किलोमीटर अंतरावर राजगड हॉटेलच्या पुढे अज्ञात वाहन उभे होते  ते अचानक दिसल्याने मोटारसायकल उजव्या बाजूने घेत असताना स्लिप होऊन गाडीसह खाली पडून डोके रस्त्यावर आदळल्याने डोक्याला पाठीमागील बाजूस  गंभीर लागल्याने व  व पोटात खरचटल्याने रक्तस्राव जास्त झाल्याने  जागीच  ठार झाले  व त्यांच्या पत्नी  निर्मलाबाई यांनाही डोकीस  गंभीर मार लागला आहे. दोघेही रस्त्यावर पडलेले असताना त्यांच्या ओळखीचे सुभाष मनोहर बिडवे हे यांनी त्या दोघांना उपचारासाठी दाखल केले. जगदाळे मामा हॉस्पीटल येथे दाखल केले असता दगडू जाधवर हे उपचारापुर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

Web Title: Two-wheeler accident near Agalgaon; Death of husband who went shopping for Diwali, wife serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.