बार्शीत शुक्रवारी नव्याने आढळले दोन कोरोना बाधित रुग्ण; २३ अहवाल अद्याप प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 11:46 AM2020-06-19T11:46:51+5:302020-06-19T11:48:53+5:30

बार्शी तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या झाली सहा; नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Two corona-infected patients newly found in Barshi on Friday; 23 reports still pending | बार्शीत शुक्रवारी नव्याने आढळले दोन कोरोना बाधित रुग्ण; २३ अहवाल अद्याप प्रलंबित

बार्शीत शुक्रवारी नव्याने आढळले दोन कोरोना बाधित रुग्ण; २३ अहवाल अद्याप प्रलंबित

Next
ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर ग्रामीण पोलीस संचारबंदी काळात सतर्क

बार्शीबार्शी शहरात कोरोनाचे पहिले चार पॉझिटिव्ह रुग्ण असताना आज शुक्रवार १९ जून रोजी सकाळी नऊ वाजता प्राप्त झालेल्या सतरा अहवालात बार्शी शहरातील उपळाई रोड येथील दोन अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे शहरातील रुग्णांचा आकडा आता सहा झाला आहे.

आज आलेले दोन अहवाल हे उपळाई रोड येथील यापूर्वी पॉझिटिव्ह निघालेल्या डॉक्टराच्या संपर्कातून पॉझिटिव्ह झाले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी संतोष जोगदंड यांनी दिली.

गुरुवारी रात्री बार्शी शहर व ग्रामीण भागातील एकूण ४० अहवाल प्रलंबित होते. त्यातील बार्शी शहरातील २६, वैराग येथील १० पांगरी येथील २, खांडवी येथील १, कुसळब येथील १ असे अहवालांचा समावेश होता. आज सकाळी आलेल्या सतरा अहवालात खांडवीमधील एकमेव अहवाल  निगेटिव्ह आला तर पांगरीतील दोन अहवालापैकी एक निगेटिव्ह आला तर एक अहवाल येणे बाकी आहे.

आणखीन २३ प्रलंबित असून त्यांचे रिपोर्ट संध्याकाळपर्यंत येणे अपेक्षित आहे. प्रलंबित अहवालात बार्शी शहरातील ११, वैराग १० ,पांगरी आणि कुसळंब येथील एका अहवालाचा समावेश आहे.

बार्शी शहरांमध्ये सोलापूर रोड येथील बगले बरड येथे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. तर वाणी प्लॉट येथील पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी गेला आहे.  तर आता उपळाई रोडला तीन पॉझिटिव्ह झाले असून त्यातील एक पॉझिटिव्ह रुग्ण पुणे येथील खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहे.

बार्शी शहरांमध्ये रोज वाढणारी गर्दी आणि नागरिकांचा बेजबाबदारपणा यामुळे सुद्धा शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी शारीरिक अंतर राखून तोंडाला मास्क वापरणे आणि शक्यतो स्वतःचे शरीर आणि घर निर्जंतुक करण्याकडे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही डॉ. संतोष जोगदंड यांनी सांगितले.

Web Title: Two corona-infected patients newly found in Barshi on Friday; 23 reports still pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.