कार, रिक्षा अन् दुचाकीचा तिहेरी अपघात; पती-पत्नी ठार, सांगोला तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 08:00 PM2021-11-29T20:00:49+5:302021-11-29T20:01:31+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Triple accident of car, rickshaw and two-wheeler; Husband and wife killed, incident in Sangola taluka | कार, रिक्षा अन् दुचाकीचा तिहेरी अपघात; पती-पत्नी ठार, सांगोला तालुक्यातील घटना

कार, रिक्षा अन् दुचाकीचा तिहेरी अपघात; पती-पत्नी ठार, सांगोला तालुक्यातील घटना

googlenewsNext

सांगोला  : भरधाव कार, रिक्षा व दुचाकीच्या  झालेल्या तिहेरी भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतमजूराचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या पत्नीचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. हा अपघात काल सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास सांगोला - पंढरपूर रोड वरील हॉटेल चंद्रमाला जवळ घडला.

या अपघातानंतर रिक्षा चालक रिक्षा घेऊन पळून जाताना ग्रामस्थांनी बामणी (ता. सांगोला) गावात पकडले. ज्ञानदेव नामदेव भिसे (वय -४५) व बबिता ज्ञानदेव भिसे - (वय -४० दोघेही रा. फणेपुर ता. लोहारा जि. उस्मानाबाद) असे मृत पती-पत्नीची नावे आहेत. या अपघातात कार चालक जखमी झाला असून त्याचे नाव समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस नाईक राहुल देवकते घटनास्थळी धाव घेऊन मृत व जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून सांगोला रुग्णालयात हलवले. मृतांचे नातेवाईक (मूळ फणेपूर ता.लोहारा जि.उस्मानाबाद)  येथून  येण्यास विलंब लागल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते तर अपघाताची नोंदही झाली नव्हती. 

Web Title: Triple accident of car, rickshaw and two-wheeler; Husband and wife killed, incident in Sangola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.