सोलापूर स्मार्ट सिटीच्या कार्यकारी संचालकपदी त्रिंबक ढेंगळे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 07:47 PM2020-08-14T19:47:18+5:302020-08-14T19:47:45+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Trimbak Dhengale-Patil as the Executive Director of Solapur Smart City | सोलापूर स्मार्ट सिटीच्या कार्यकारी संचालकपदी त्रिंबक ढेंगळे-पाटील

सोलापूर स्मार्ट सिटीच्या कार्यकारी संचालकपदी त्रिंबक ढेंगळे-पाटील

googlenewsNext

सोलापूर : सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी (स्मार्ट सिटी)च्या कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती प्रतिनियुक्तीने असून ढेंगळे-पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी पदभार घेतला.


केंद्र शासनाच्या संकल्पनेतून स्मार्ट सिटी योजना राबविली जाते. स्मार्ट सिटी अंतर्गत निवड झालेल्या शहरांमध्ये कामे करण्यासाठी एका कंपनीची स्थापना केली जाते. या कंपनीचे अध्यक्ष राज्याच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांकडे असते. या कंपनीत संचालक म्हणून महापौर, उपमहापौरसह पदाधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि इतर तज व्यक्तीचा समावेश आहे. कंपनीची स्थापना झाल्यानंतर पहिले काही दिवस अमिता दगडे यांची तर काही महिन्यानंतर संजय तेली यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

तेली यांच्या बदलीनंतर तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सीईओंचा पदभार सांभाळला. महापालिकेचे सध्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, आता त्रिंबक ढेंगळे-पाटील यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ढेंगळे-पाटील यांनी यापूर्वी महापालिकेचे उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांची उस्मानाबादला जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. आता ते स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक म्हणून रुजू होत आहेत. त्यांचा कालावधी एक वर्षाचा आहे.

Web Title: Trimbak Dhengale-Patil as the Executive Director of Solapur Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.