coronavirus; सोलापुरात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही; पण प्रत्येकाला दक्षता घ्यावी लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:10 AM2020-03-24T11:10:41+5:302020-03-24T11:13:02+5:30

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन : गरजेशिवाय बाहेर पडणाºयांवर होईल कारवाई

There is no patient positive in Solapur; But everyone has to be careful | coronavirus; सोलापुरात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही; पण प्रत्येकाला दक्षता घ्यावी लागेल

coronavirus; सोलापुरात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही; पण प्रत्येकाला दक्षता घ्यावी लागेल

Next
ठळक मुद्देआयसोलेशन सेंटरमध्ये असलेल्या १७ रुग्णांचे रिझल्ट निगेटिव्ह आलेजिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही, पण यापुढेही गंभीर दक्षता घेणे गरजेचे लोकांनी घराबाहेर पडू नयेत, यासाठीआवश्यक ती काळजी घ्यावी

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे़ यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील जिल्हाधिकाºयांशी व्हिसीवर संवाद साधत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत़सोलापूरकरांनी संचारबंदीचे पालन करावे अशा सुचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आयसोलेशन सेंटरमध्ये असलेल्या १७ रुग्णांचे रिझल्ट निगेटिव्ह आलेले आहेत़ जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही, पण यापुढेही गंभीर दक्षता घेणे गरजेचे असून, लोकांनी घराबाहेर पडू नयेत, यासाठीआवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले़ संचारबंदी काळात औषधे आणि इतर अत्यावश्यक सेवेत कमतरता येऊ नये, याची चर्चा व्हिसीवर झाली आहे़ यासंदर्भात आवश्यक उपाययोजनांचा आढावाही घेण्यात आला आहे़ गरजेशिवाय बाहेर पडणाºयांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी दिली.

दोन महिने पुरेल इतके धान्य उपलब्ध
- जिल्ह्यात दोन महिने पुरेल इतक ा धान्यसाठा शिल्लक आहे़ त्यात गहू ६ हजार १७२ मेट्रिक टन, तांदूळ ३ हजार २८१ मे़ टन,साखर १५० मे़ टन, डाळ १२५ मे़ टन इतका धान्यसाठा शासनाकडे उपलब्ध आहे़ तर खुल्या बाजारात एक महिन्याचा धान्य साठा उपलब्ध आहे़ गहू २३ हजार ७०० मे़ टन, तांदूळ २९ हजार १२१ मे़ टन, साखर २ हजार ८५० मे़ टन, ज्वारी ३६ हजार ३५० मे़ टन, डाळ १४ हजार ९१० मे़ टन, खाद्यतेल १ लाख ७४ हजार ५५० लिटर उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली आहे़

Web Title: There is no patient positive in Solapur; But everyone has to be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.