सिगारेटचे बॉक्स भरून पुण्याकडे निघालेला टेम्पो टेंभुर्णीजवळ लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:14 PM2021-09-22T16:14:03+5:302021-09-22T16:14:15+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग...

The tempo, which was on its way to Pune with a box of cigarettes, was looted near Tembhurni | सिगारेटचे बॉक्स भरून पुण्याकडे निघालेला टेम्पो टेंभुर्णीजवळ लुटला

सिगारेटचे बॉक्स भरून पुण्याकडे निघालेला टेम्पो टेंभुर्णीजवळ लुटला

googlenewsNext

टेंभुर्णी : सिगारेटचे बॉक्स भरून पुण्याकडे निघालेला टेम्पो अडवून अज्ञात ६ ते ७ लोकांनी टेम्पो चालक व त्याचा जोडीदारास मारहाण करून ट्रक पळवून नेला व नंतर ट्रकमधील सुमारे १ कोटी रुपये किंमतीचे २५० सिगारेटचे बॉक्स चोरून नेल्याची धक्कादायक घटना सोलापूर पुणे रोडवर टेंभुर्णी शहराच्या पश्चिम बाजूस शिराळा गावच्या हद्दीत मंगळवार दि. २१ रोजी सायंकाळी ७.३० ते ८च्या दरम्यान घडली आहे.

 याबाबत टेंभुर्णी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दि. २१ सप्टेंबर रोजी मोहम्मद इम्तियाज मोहम्मद मुमताज (वय ३८) रा. गुरुब्रह्मानगर ,हैदराबाद हा टेम्पो चालक व त्याचा साथीदार मोहम्मद इस्माईल हे दोघे एपी२२/एटी २९७२  या क्रमांकाच्या टेम्पोमधून २५० सिगारेटचे बॉक्स घेऊन पुण्याकडे निघाले होते. सदर ट्रक टेम्भूर्णी हद्दीतील अहमदनगर कडे जाणाऱ्या रोडवरील ब्रिज ओलांडून टेंभुर्णी शहराच्या पश्चिम बाजूस २ ते ३कि.मी .अंतरावर आला असता तेथे ६ ते ७ अनोळख्या इसमांनी सदर टेम्पो अडवून टेम्पो चालक व त्याचा साथीदार यांना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी टेम्पो चालक व त्याच्या साथीदारास खाली उतरण्यास भाग पाडले व सिगारेटचे बॉक्स भरलेल्या टेंपो घेऊन पसार झाले. नंतर हा टेम्पो घटना घडलेल्या ठिकाणापासून इंदापूर शहराच्या पश्चिमेस पंचवीस ते तीस किमी अंतरावर रिकाम्या अवस्थेत आढळून आला. तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
 अज्ञात चोरट्यांनी रोडरॉबरी करून पळवून नेलेल्या २५० सिगारेटच्या बॉक्सची किंमत ९९ लाख ३७ हजार १७५ रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतची फिर्याद ट्रक चालक मोहम्मदइम्तियाज याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिसांच्या पाच तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे करीत आहेत.

Web Title: The tempo, which was on its way to Pune with a box of cigarettes, was looted near Tembhurni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.