युवकांकडून ‘पर्यावरण रक्षा, जगाची सुरक्षा’चा नारा

By Appasaheb.patil | Published: July 1, 2019 05:03 PM2019-07-01T17:03:48+5:302019-07-01T17:06:18+5:30

होटगी स्टेशन येथील तरूणांनी घेतली वृक्षसंवर्धनाची जबाबदारी; स्वखर्चातून वृक्षलागवड

'Survival of the World, Survival of the World' by Youth | युवकांकडून ‘पर्यावरण रक्षा, जगाची सुरक्षा’चा नारा

युवकांकडून ‘पर्यावरण रक्षा, जगाची सुरक्षा’चा नारा

googlenewsNext
ठळक मुद्देवृक्षलगावड ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे समजून प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेतली पाहिजेसमाजाने पुढाकार घेतल्यास पर्यावरणाचा नाश होणे थांबणार आहे़निसगार्तून माणसाला जिद्द, उत्साह मिळतो त्यामुळे प्रत्येकाने किमान एका झाडाचे पालकत्व घेऊन ते झाड मोठं केलं पाहिजे

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : वृक्षलगावड ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे समजून प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेतली पाहिजे. समाजाने पुढाकार घेतल्यास पर्यावरणाचा नाश होणे थांबणार आहे. निसगार्तून माणसाला जिद्द, उत्साह मिळतो त्यामुळे प्रत्येकाने किमान एका झाडाचे पालकत्व घेऊन ते झाड मोठं केलं पाहिजे. निसर्गाला सोबत घेऊन चाललो तर मानवाची प्रगती नक्की होईल हेच उद्देश डोळ्यासमोर होटगी स्टेशन (ता़ द़ सोलापूर) येथील युवकांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊन झाडे लावण्यास सुरूवात केली़ नुसती झाडेच नाही लावली तर ती झाडे कायमस्वरूपी टिकविण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेतली शिवाय विकतचे पाणी आणून झाडांना जीवदान देण्याचा काम त्या युवकांनी केले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन येथील २० ते २५ युवक एकत्र येऊन फेबु्रवारी महिन्यात ‘पर्यावरण रक्षा जगाची सुरक्षा’ या नावाने एक टीम तयार केली़ या टीमच्या माध्यमातून होटगी स्टेशन परिसरातील हनुमान मंदीर, भवानी मंदीर, उर्दू प्राथमिक शाळा, मुस्लिम कब्रस्थान, होटगी स्टेशन, सोलापूर रोड आदी भागात वृक्षलागवड केली.

एवढेच नव्हे हा उपक्रम सातत्याने पुढे असेच सुरू ठेवण्यासाठी आठवड्यातून प्रत्येक रविवारी वृक्षसंवर्धानाबरोबरच वृक्ष जोपासण्यासाठी टीममधील प्रत्येक युवकांनी जबाबदारी घेतली आहे़ हा स्तुत्य उपक्रम पाहून अनेक युवक आता या टीममध्ये सहभागी होण्यासाठी पुढे येऊ लागली आहेत़ त्यामुळे वृक्षारोपन करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ याकामी ग्रामस्थ, ग्रामपंचायत, गावातील प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी सहकार्य करीत असल्याचे पर्यावरण रक्षा जगाची सुरक्षा या टिममधील युवकांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

गिफ्टच्या बदल्यात झाड
होटगी स्टेशन परिसरात एखाद्याचं लक्ष असेल किंवा वाढदिवस असेल तर पर्यावरण रक्षा जगाची सुरक्षा या टिमच्या माध्यमातून त्या नव्या वधुवरांना गिफ्ट न देता झाड देऊन ते झाड वाढेपर्यंतची जबाबदारी दिली जात आहे़ एवढेच नव्हे तर होटगी स्टेशन परिसरात होणाºया प्रत्येक कार्यक्रमात हार, तुरे, पुष्पगुच्छ आदी वस्तुने गौरव, सन्मान, सत्कार करताना अनावश्यक खर्चाला फाटा देत वृक्ष देण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे़ युवकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे परिसरातील लोकांनी या युवकांच्या कामाचे कौतुक केले आहे़ हा उपक्रम असाच कायम सुरू राहणार असल्याचं मत युवकांनी व्यक्त केले.

Web Title: 'Survival of the World, Survival of the World' by Youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.