सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना मिळाले वीज विक्रीतून ४२२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 05:46 PM2018-06-26T17:46:15+5:302018-06-26T17:48:12+5:30

विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना गाळपात देशात व राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

Sugar factories in Solapur district got 422 crore from power sale | सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना मिळाले वीज विक्रीतून ४२२ कोटी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना मिळाले वीज विक्रीतून ४२२ कोटी

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर जिल्हा साखर कारखानदारीत राज्यात व देशातही आघाडीवरसोलापूर जिल्ह्यात ४० साखर कारखानेतब्बल ६६ कोटी ६९ लाख ४१ हजार २९ युनिट इतकी वीज शासनाला विक्री

अरुण बारसकर
सोलापूर: साखर उत्पादनात देशात आघाडीवर असलेले सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने वीज उत्पादनातही आघाडीवरच असून, जिल्ह्यातील २० साखर कारखान्यांनी तब्बल ६६ कोटी ६९ लाख ४१ हजार २९ युनिट इतकी वीज शासनाला विक्री करुन ४२१ कोटी ७४ लाख ५३ हजार ४६९ रुपये मिळविले आहेत. ५९ कोटी ४८ लाख १२ हजार ४०० इतकी रक्कम माढ्याच्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याला मिळाली आहे.

सोलापूर जिल्हा साखर कारखानदारीत राज्यात व देशातही आघाडीवर आहे. सोलापूर जिल्ह्यात ४० साखर कारखाने असून, विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना गाळपात देशात व राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जसा साखर उत्पादनात विठ्ठल साखर कारखाना प्रथम आहे तसा वीज उत्पादनातही आघाडीवर आहे. सरलेल्या साखर हंगामात सोलापूर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांनी एक कोटी ६९ लाख ३५ हजार ४९६ मे.टन ऊस गाळप केले असून, एक कोटी ७९ लाख १७ हजार ७३३ क्विंटल साखर तयार झाली आहे. सोलापूरनंतर अहमदनगर जिल्ह्याचे गाळप एक कोटी ३७ लाख मे़टन इतके झाले आहे़

ऊस गाळपाप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांनी वीजनिर्मिती केली व ती शासनाला विकली. सरत्या हंगामात २० कारखान्यांनी ६६ कोटी ६९ लाख ४१ हजार २९ युनिट इतकी वीज शासनाला विक्री करुन ४२१ कोटी ७४ लाख ५३ हजार ४६९ रुपये मिळविले आहेत. साखर, वीज व इथेनॉलच्या माध्यमातूनही साखर कारखान्यांना उत्पादन मिळाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात विठ्ठल सहकारी साखर कारखाना पिंपळनेर(ता. माढा) ने सर्वाधिक ५९ कोटी ४८ लाख १२ हजार ४०० रुपयांची वीज शासनाला विक्री केली आहे. शिंदे कारखान्यानंतर अकलूजच्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याला वीज विक्रीतून ३७ कोटी ६७ लाख २६ हजार ८९६ रुपये मिळाले आहेत. आचेगावच्या जयहिंद शुगर या खासगी कारखान्याने ३० कोटी ४७ लाख ३१ हजार ६२५ रुपयांची वीज विकली. श्रीपूर येथील पांडुरंग साखर कारखान्याचे वीजनिर्मिती प्रकल्प दोन आहेत. सोलापूर महानगरपालिकेचा सोलापूर बायो एनर्जी हा कचºयापासून वीजनिर्मिती प्रकल्प आहे. 

कारखान्याचे नाव        वीज    रक्कम
- इंद्रेश्वर शुगर, बार्शी         २,२२,३५,०८८    १३,८७,४६,९४८
- भैरवनाथ शुगर, विहाळ        २,६३,०३,०४९    १६,४४,१०,७३५
- भैरवनाथ शुगर,मंगळवेढा    २,७५,३३,८६९    १७,६४,१०,०९७
- जकराया शुगर, वटवटे        १,९०,०५,८५७    ११,८५,९६,५५०
- सहकार महर्षी, अकलूज    ६,०३,७२,९००    ३७,६७,२६,८९६
- लोकनेते शुगर, अनगर        ३,३३,३७,२००    २१,४६,६८,४०५
- विठ्ठलराव शिंदे, पिंपळनेर    ९,५३,२२,५००    ५९,४८,१२,४००
- सासवड माळी शुगर        ३,६६,३४,५००    २३,२९,९५,४२०
- श्री पांडुरंग सहकारी श्रीपूर-१    २,८९,३१,४००    १८,०५,३१,९३६
- विठ्ठल सहकारी, गुरसाळे    ३,७६,९६,७८९    २३,५१,१०,०८५
- विठ्ठल शुगर, म्हैसगाव        १,८०,५५,०००    ११,२२,५७,३८०
- श्री पांडुरंग सहकारी-    २    १,४३,४५,२८०    ८,९५,१४,५४८
- युटोपियन शुगर,मंगळवेढा    ४,०३,७३,१००    २६,००,०२,७६४
- शिरोमणी वसंतराव काळे    १,६९,०२,४००    १०,६२,८८,३५७
- लोकमंगल शुगर भंडारकवठे    २,९२,०५,५१०    १८,२२,४२,३८३
- बबनरावजी शिंदे शुगर, पिंपरी    ३,७८,१५,००१    २४,३३,५२,४९६
- जयहिंद शुगर, आचेगाव    ४,६८,९७,१७३    ३०,४७,३१,६२५
- सिद्धनाथ शुगर, तिºहे        २,९५,८४,११२    १९,०५,२१,६८२
- भैरवनाथ शुगर,आलेगाव    २,८२,२३,१३४    १८,१७,५६,९८२
- मातोश्री लक्ष्मीबाई शुगर    १,३०,०५,९००    ८,२७,१७,५२४
- सीताराम महाराज खर्डी        ४९,०३,४१७    २,९८,२२,८१६
- सोलापूर महानगरपालिका    २,५७,८५०    १२,३५,४३०
    एकूण            ६६,६९,४१,०२९    ४२१,७४,५३,४६९

Web Title: Sugar factories in Solapur district got 422 crore from power sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.