Breaking; एफआरपी थकविणाºया कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 12:41 PM2020-10-13T12:41:09+5:302020-10-13T12:43:02+5:30

राज्यातील ७६ कारखान्यांना गाळप परवाने; एफआरपी चुकती करणाºयांनाच गाळप परवाना देण्याची साखर आयुक्तांची भूमिका कायम

Sugar Commissioner's notice to FRP exhausting factories | Breaking; एफआरपी थकविणाºया कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस

Breaking; एफआरपी थकविणाºया कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देमागील तीन-चार वर्षापासून वरचेवर एफआरपी थकविणाºया कारखान्यांच्या संख्येत वाढ होत आहेजिल्ह्यातील सात साखर कारखान्यांना शुक्रवारपर्यत गाळप परवाना दिला आहे१४ तारखेपर्यंत एफआरपी चुकती करणार्या साखर कारखान्यांनाच गाळप परवाना दिला जाणार

सोलापूर : मागील वर्षीच्या उसाची संपुर्ण रक्कम दिल्यानंतरच गाळप परवाना, या साखर आयुक्तांच्या भूमिकेमुळे एफआरपी न देणाºया कारखान्यांना नोटीस काढण्यात आली आहे. साखर सहसंचालक कार्यालयाकडून १७० प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला सादर झाले असले तरी सोमवारपर्यत राज्यातीत ७६ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. 

राज्यातील १९८ साखर कारखान्यांनी यावर्षीच्या गाळपासाठी परवाने मागीतले आहेत. साखर सहसंचालक कार्यालयाकडून तपासणी करुन जवळपास १७० कारखान्यांचे अर्ज साखर आयुक्त कार्यालयाला सादर झाले आहेत. यापैकी ७६ कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे. उर्वरित कारखान्यांचे प्रस्ताव तपासणी करून साखर आयुक्तांकडे सादय केले जात आहेत. एफआरपी थकलेल्या कारखान्यांची माहिती सहसंचालक कार्यालयाकडूनच दिल्याने परवान्यासाठी प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयात पेंडीग आहेत. आता एफआरपी थकविणार्या कारखान्यांना रितसर नोटीस पाठविण्यात आली आहे. शेतकºयांचे पैसे थकविणार्या कारखान्यांची आरआरसी करण्याची कारवाई करण्यासाठी ही नोटीस आहे. 

मागील तीन-चार वर्षापासून वरचेवर एफआरपी थकविणाºया कारखान्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे एफआरपी थकविणार्या व टप्पे पाडून ऊस बिल देणार्या कारखान्यांची संख्या ४३ इतकी झाली असल्याचे सांगण्यात आले. भागभांडवल व शासनाची थकहमी देण्यासाठीही नोटीस देण्यात आल्या आहेत.
--------------

  • सोलापूर जिल्ह्यातील एकरकमी एफआरपी न देता शेतकºयांसोबत करार करुन टप्पा पद्धतीने जिल्ह्यातील पाच कारखाने शेतकर्यांना उसाचे बिल देत आहेत. हे साखर कारखाने येत्या दिवाळीला शेवटचा हप्ता देणार आहेत. माञ साखर आयुक्तांच्या तंबीमुळे साखर कारखाने सुरू करण्याअगोदर संपुर्ण रक्कम द्यावे लागणार आहेत. याशिवाय एफआरपी थकविणारे पाच कारखाने आहेत. 
  • - या पाच कारखान्यांन्यापैकी श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखान्यांने शेतकर्यांच्या खात्यावर उर्वरित रक्कम जमा केली आहे. 
  • - जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांना शुक्रवारपर्यत गाळप परवाना दिला आहे. लोकनेतेबाबुरावआण्णा पाटील, भैरवनाथ लवंगी,जकराया शुगर, इंद्रेश्वर, विठ्ठलराव शिंदे करकंब, गोकुळ माऊली,औदुंबरआण्णा पाटील आष्टी या कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे.

--------

१४ तारखेपर्यंत एफआरपी चुकती करणार्या साखर कारखान्यांनाच गाळप परवाना दिला जाणार आहे. ज्यांनी- ज्यांनी एफआरपी दिली नाही त्यांना १४ आॅक्टोबरपर्यंत शेतकºयांंचे पैसे देण्याची नोटीस काढली आहे. तरीही शेतकºयांचे पैसे दिले नाहीत तर आरआरसीची कारवाई केली जाईल.
- शेखर गायकवाड 
साखर आयुक्त, पुणे 

केवळ साखर विक्रीचे कारखानदार बोलतात. इथेनॉल, वीज व इतर उत्पादनातून मिळणार्या पैशाचाही हिशोब कारखानदारांनी दिला पाहिजे. दीड वर्षे सांभाळलेल्या उसाचे अडीच वर्षानंतरही व्याजासह शेतकर्यांना पैसे मिळाले पाहिजेत.
-प्रभाकर देशमुख 
जनहित शेतकरी संघटना 

Web Title: Sugar Commissioner's notice to FRP exhausting factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.