Maharashtra Election 2019; सुभाष देशमुखांच्या उत्पन्नात घट; २ कोटीवरून २३ लाखांवर आले उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 08:40 PM2019-10-04T20:40:19+5:302019-10-04T20:42:56+5:30

सुभाष देशमुख यांनी २०१६ नंतर हिंदू अविभक्त कुटुंब या सदराखाली आपली मालमत्ता वर्ग केल्याचे नमूद केले आहे.

Subhash Deshmukh's income decline; The income came from 2 crores to 2 lakhs | Maharashtra Election 2019; सुभाष देशमुखांच्या उत्पन्नात घट; २ कोटीवरून २३ लाखांवर आले उत्पन्न

Maharashtra Election 2019; सुभाष देशमुखांच्या उत्पन्नात घट; २ कोटीवरून २३ लाखांवर आले उत्पन्न

Next

सोलापूर : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या वार्षिक उत्पन्नात कमालीची घट झाली आहे . पाच वर्षांपूर्वी त्यांचे उत्पन्न २ कोटी ३७ लाखापर्यंत होते या आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न एकदम २३ लाखांपर्यंत घसरले आहे . निवडणूक अजंर्सोबत सादर केलेल्या आयकर विवरणपत्रांतून ही बाब समोर आली आहे .

२०१४ साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ३१ मार्च २०१५ अखेर २ कोटी ३७ लाख ९६ हजार इतके वार्षिक उत्पन्न होते .त्यांच्या पत्नी स्मिता यांचे २४ लाख ३९ हजार होते . दुस?्या वर्षी त्यांच्या उत्पन्नात वाढही झाली मात्र मार्च २०१६ नंतर त्यात मोठी घट झालीय .  यंदा सुभाष देशमुख यांचे वार्षिक उत्पन्न अवघे २३ लाख ७३  हजार रुपये तर पत्नी स्मिता यांचे ३१०० रुपये झाले आहे . 
--------
हिंदू अविभक्त कुटुंबात मालमत्ता केली वर्ग
सुभाष देशमुख यांनी २०१६ नंतर हिंदू अविभक्त कुटुंब या सदराखाली आपली मालमत्ता वर्ग केल्याचे नमूद केले आहे .
त्यामुळे या सदरात  काही बँकांचे शेअर्स , स्थावर मालमत्ता ,सोने ,रोखड वर्ग करून स्वतंत्र बँक खातेही काढण्यात आले आहे .जवळपास १५कोटी ९२ लाखांची जंगम आणि स्थावर मालमतेचा त्यात समावेश आहे . या हिंदू अविभक्त कुटुंबावर ९ कोटी ३२ लाखाचे कर्जही आहे.

Web Title: Subhash Deshmukh's income decline; The income came from 2 crores to 2 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.