‘एसटी’च्या तिकीट मशीन्स पडल्या बंद; परिवहन महामंडळाने वाहकालाच धरले जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 01:26 PM2020-12-04T13:26:20+5:302020-12-04T13:28:02+5:30

कंडक्टर्सकडून पाच कोटींची वसुली; कर्मचारी संघटनांचा विरोध : न्यायालयात दाद मागण्याचा दिला इशारा

‘ST’s’ ticket machines shut down; The transport corporation held the carrier responsible | ‘एसटी’च्या तिकीट मशीन्स पडल्या बंद; परिवहन महामंडळाने वाहकालाच धरले जबाबदार

‘एसटी’च्या तिकीट मशीन्स पडल्या बंद; परिवहन महामंडळाने वाहकालाच धरले जबाबदार

Next
ठळक मुद्देएसटी प्रशासनाने २०१६ मध्ये खासगी कंपनीकडून तिकीट मशीन घेतल्याराज्यातील १५ ते २० हजार मशीन्स बंद पडल्याचे सांगण्यात आलेवाहकाकडून दुरुस्तीसाठी दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम वसूल केली

सोलापूर : ‘एसटी’च्या तिकीट मशीन्स (ईटीआयएम) बंद पडल्याबद्दल वाहकांना जबाबदार धरून राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरात त्यांच्याकडून एकूण ५ कोटी रुपये वसूल करण्याची मोहीम सुरू केली आहे. सोलापुरातून ३२ लाखांच्या नुकसानभरपाईपोटी आजवर ५२ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. दरम्यान, मशीनची भरपाई कर्मचाऱ्यांनी का द्यावी? अशी भूमिका घेऊन याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

एसटी प्रशासनाने २०१६ मध्ये खासगी कंपनीकडून तिकीट मशीन घेतल्या. या मशीनचे प्रिंटर काम न करणे, बॅटरी खराब होणे, मशीन हॅँग होणे, की-पॅड नादुरुस्त होणे, असे एक ना अनेक बिघाड झाले आहेत. या कारणाने राज्यातील १५ ते २० हजार मशीन्स बंद पडल्याचे सांगण्यात आले. मशीनची जबाबदारी संबंधित वाहकावर असल्याने संबंधित वाहकाकडून दुरुस्तीसाठी दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम वसूल केली जात आहे. रक्कम वसूल न केल्यास आगारप्रमुख आणि स्थानकप्रमुख यांना जबाबदार धरून त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्याने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

खराब पार्ट का दाखवले नाहीत?

२०१६ साली घेण्यात आलेल्या मशीनची क्षमता किती?, मशीनमधील कोणते इलेक्ट्रॉनिक पार्ट किती दिवस चालतात?, जे पार्ट खराब झाले ते पार्ट कामगारांना का दाखवले नाहीत?, वाहकाकडून मशीन ताब्यात घेताना ती सुस्थितीत आहे का नाही? याची जबाबदारी संबंधित कारकुनाची असते; मग वाहकाकडून विनाकारण वसुली का केली जात आहे, असे सवाल वाहकांनी उपस्थित केले आहेत.

‘एसटी’ प्रशासन खासगी कंपनीशी हितसंबंध जोपासण्यासाठी वसुली करत आहे. राज्यभरातून पाच कोटींपेक्षा जास्त रकमेची वसुली आहे. फक्त सोलापूर विभागातून जवळपास ३२ लाखांची वसुली काढण्यात आली आहे. अशा प्रकारे काढलेला आदेश कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे. हा आदेश प्रशासनाने मागे घ्यावा अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ.

मुकेश तिगोटे, सरचिटणीस, इंटक

Web Title: ‘ST’s’ ticket machines shut down; The transport corporation held the carrier responsible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.