संघर्ष पेटला! सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक; गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 05:03 PM2021-07-01T17:03:46+5:302021-07-01T19:10:07+5:30

भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी सोलापुरात दगडफेक करण्यात आली होती.

Stone pelting at NCP office in Solapur; Padalkar struggle erupted against the NCP | संघर्ष पेटला! सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक; गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते आक्रमक

संघर्ष पेटला! सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक; गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते आक्रमक

Next

सोलापूर : सोलापूर शहरात असलेल्या रामलाल चौकातील सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा कार्यालयाच्या काचेवर दगड मारुन तोडफोड करण्याचा प्रयत्न दोन इसमांनी केला आहे. तोडफोड करणारे हे गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात आले. 

भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी सोलापुरात दगडफेक करण्यात आली होती. गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. गाडीवर हल्ला करणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यानंतर गुरूवारी दुपारच्या सुमारास सोलापूर शहरातील राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस दलातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Web Title: Stone pelting at NCP office in Solapur; Padalkar struggle erupted against the NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.