सोलापूर जिल्ह्यातील एसटी गाड्या बंद; विद्यार्थी रिक्षाने पोहोचू लागले कॉलेजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 07:15 PM2021-12-08T19:15:22+5:302021-12-08T19:15:28+5:30

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या घटली; एसटी बसेस सुरू करण्याची मागणी

ST trains closed in Solapur district; Students started reaching the college by rickshaw | सोलापूर जिल्ह्यातील एसटी गाड्या बंद; विद्यार्थी रिक्षाने पोहोचू लागले कॉलेजला

सोलापूर जिल्ह्यातील एसटी गाड्या बंद; विद्यार्थी रिक्षाने पोहोचू लागले कॉलेजला

Next

सोलापूर : जवळपास दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा नुकत्याच सुरू झाले आहेत. शाळा झाली सुरू असल्या तरी आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी शाळेची पायरी चढली नाही. काही पालकांनी कोरोनाच्या भीतीपोटी तर काही विद्यार्थी एसटी गाड्या बंद असल्यामुळे शाळा-महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत. काही विद्यार्थी रिक्षाने प्रवास करून शिक्षण घेत आहेत .

एसटी कर्मचाऱ्यांचा मागील अनेक दिवसांपासून संप सुरू आहे. या संपाला कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पण दुसरीकडे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. एसटी बंद असल्यामुळे अनेक मुलींच्या पालकांनी सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत मुलींना शाळा-महाविद्यालय पाठवलेले नाही. कारण एसटीमध्ये मुलींसाठी सुरक्षित मानले जाते. पण सध्या संपाचा काळ असल्यामुळे शाळा-महाविद्यालय सुरू असूनही अनेक विद्यार्थी शाळेत पोहोचलेच नाहीत.

तिकिटाची सवलत बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थी घरीच

विद्यार्थ्यांना एसटीमधून प्रवास करण्यासाठी विविध सवलती मिळतात. एसटी बंद असल्यामुळे या सवलतीचा प्रश्नच राहत नाही. तसेच लॉकडाऊन व इतर कारणामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती खालवली आहे. यामुळे पालक हे विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.

Web Title: ST trains closed in Solapur district; Students started reaching the college by rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.