शेतमजुर झाला सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 03:01 PM2020-01-01T15:01:44+5:302020-01-01T15:24:14+5:30

ठरल्याप्रमाणे भाजपच्या समविचारी पक्षाचा अध्यक्ष करण्यात यश 

Solapur Zilla Parishad President's opportunity to work! | शेतमजुर झाला सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष !

शेतमजुर झाला सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष !

Next
ठळक मुद्देझेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर समविचारी आघाडीचे सदस्य निवडून आलेसत्तेसाठी मोहिते-पाटील काहीही करतात, असाही आरोप झाला सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उभं करणं हे फक्त विजयसिंह मोहिते-पाटीलच करू शकतात,

सोलापूर :  शेतमजुरी करणारा अनिरुद्ध कांबळे हा एक सामान्य कार्यकर्ता आज झेडपी अध्यक्ष झाला. सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उभं करणं हे फक्त विजयसिंह मोहिते-पाटीलच करू शकतात, अशी प्रतिक्रिया युवा नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी झेडपी अध्यक्ष निवडीनंतर व्यक्त केली. 

झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर समविचारी आघाडीचे सदस्य निवडून आले. अध्यक्ष पदासाठी अनिरुद्ध कांबळे यांचे नाव विजयदादांनी सुचविले व त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी ताकद लावल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राजेंद्र राऊत, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार नारायण पाटील, समाधान आवताडे या सगळ्यांनी प्रतत्न करून समविचारी आघाडीची मोट बांधली. ठरल्याप्रमाणे भाजपच्या समविचारी पक्षाचा अध्यक्ष करण्यात यश आला. गेल्या पाच वर्षांपासून मोहिते-पाटील यांच्यावर ऊठसूट कोणीही आरोप करीत आहेत. सत्तेसाठी मोहिते-पाटील काहीही करतात, असाही आरोप झाला आहे. पण ते काय करतात हे दिसून आलं असेल. 

आज जर आरोप करणाºयांनी पाहिलं तर आम्ही काय करतो, हे त्यांच्या लक्षात येईल. झेडपीत मोहिते-पाटील यांच्यामुळे जे अध्यक्ष झाले ते कोण होते, याचा अभ्यास करावा. आज झालेले झेडपी अध्यक्ष कांबळे हे शेतमजूर आहेत. अशा सामान्य कार्यकर्त्याला जनतेची सेवा करण्याची संधी दिली. यापूर्वी बºयाच जणांनी वैयक्तिक स्वार्थासाठी मोहिते-पाटील यांचा उपयोग करून घेतला. समविचारी आघाडीच्या माध्यमातून आता खरी नवी टीम तयार झाली आहे, असे धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले. 

समविचारी आघाडीबरोबर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांवर कारवाई करणार असे सांगण्यात येत आहे, त्याबाबत काय असे विचारल्यावर धैर्यशील म्हणाले, निवडणूक निर्णय अधिकाºयांनी त्यांना कायदेशीर उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना कायद्याचा अभ्यास कमी आहे, असेही ते मिस्किलपणे म्हणाले. 

संजय शिंदे विसरले...
भाजपच्या पाठिंब्यावरच संजय शिंदे अध्यक्ष झाले व विधानसभेवरही निवडून गेले. हे सगळे ते विसरले असतील, पण आम्ही भाजप काय करू शकतो हे दाखवून दिलं, अशी प्रतिक्रिया आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली. यासाठी विजयसिंह मोहिते-पाटीलांची मदत झाल्याचे सांगितले.

Web Title: Solapur Zilla Parishad President's opportunity to work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.