सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावरील वाहनांकडून २० लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 03:05 PM2020-10-22T15:05:52+5:302020-10-22T15:05:55+5:30

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांची माहिती; ओव्हरलोडिंग, विनापासिंग, विनाहेल्मेटची कारवाई

Solapur Flood; Five talukas in Solapur district were hit hardest by heavy rains | सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावरील वाहनांकडून २० लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल

सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावरील वाहनांकडून २० लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल

Next

सोलापूर : उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ)च्या वतीने जिल्ह्यातील महामागार्ववर ओव्हरलोडिंग, विनापासिंग, विनाहेल्मेट आदींबद्दल महामार्गावर धावणाºया वाहनांकडून २० लाख ६० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ओव्हरलोडिंग, विनापासिंग, विनाहेल्मेट आदी प्रकारच्या गुन्ह्याखाली हा दंड वसूल करण्यात आला आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सोलापूर जिल्ह्यातील सावळेश्वर टोलनाका, सोरेगाव, अशोकनगर, होडगी रोड, अक्कलकोट रोड, एमआयडीसी, आसरा चौक यांसह सोलापूर-विजापूर रोड, सोलापूर-पुणे रोड, सोलापूर-हैदराबाद रोड आदी मार्गांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. कारवाईदरम्यान २६ ट्रेलर, २३ खासगी बस, १३ टेम्पो, ७६ मालट्रक, ९ छोटे ट्रक, तीन मध्यम ट्रक, ६४ मोटरसायकली, तीन टुरिस्ट टॅक्सी, १९ कार, ९ जेसीबी, २ तीनचाकी टेम्पो, १० रिक्षा, दोन खासगी रिक्षा या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विनाहेल्मेट ५५ मोटरसायकलस्वार, इन्शुरन्स नसलेले ९०, लायसन्स नसलेले १३, पीयूसी नसलेल्या ११ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वीस दिवसांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
-------
कारवाईची मोहीम सुरूच राहणार : संजय डोळे
- लॉकडाऊननंतर राष्ट्रीय महामार्गसह रस्त्यावरीलही वाहतूक सुरळीत झाली आहे. वाहनधारकांनी सुरक्षेच्या दृष्टीने कायदेशीररित्या सर्व सोपस्कार पार पाडावे. वाहतुकीच्या कोणत्याही नियमाचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. गेल्या वीस दिवसांमध्ये ही कारवाई झाली आहे. आरटीओकडून ही कारवाई अशीच सुरू राहील, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.

Web Title: Solapur Flood; Five talukas in Solapur district were hit hardest by heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.