सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रा; नंदीध्वज मिरवणूक रद्द, यात्राकाळात भाविकांना प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 08:54 AM2021-01-10T08:54:45+5:302021-01-10T08:55:18+5:30

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेबाबत प्रशासनाचा आदेश; धार्मिक विधीसाठी ५० जणांना परवानगी

Siddheshwar Yatra at Solapur; Nandi flag procession canceled, devotees barred from entering during Yatra | सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रा; नंदीध्वज मिरवणूक रद्द, यात्राकाळात भाविकांना प्रवेशबंदी

सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रा; नंदीध्वज मिरवणूक रद्द, यात्राकाळात भाविकांना प्रवेशबंदी

googlenewsNext

सोलापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रा कशी होणार याची चर्चा होत असतानाच महापालिका आयुक्तांनी यात्रा परवानगी कशी असेल याबाबतचा आदेश शनिवारी रात्री उशिरा पारीत केला. यानुसार १२ ते १६ जानेवारी दरम्यान होणाºया यात्रेसाठी मंदिर भाविकांना बंद असणार असून जिल्हा व परराज्यातून भाविक येणार नाहीत यासाठी पोलीस आयुक्त आदेश जारी करणार आहेत. नंदीध्वज मिरवणूर रद्द करण्यात आली असून, धार्मिक विधीसाठी ५0 जणांना परवानगी देण्यात आली आहे. 


महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी यात्रा नियोजनाबाबत सात पाती आदेश जारी केला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवस्थानने ११ डिसेंबर रोजी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर पोलीस आयुक्त व अधीक्षक कार्यालयाने अभिप्राय सादर केला होता. या अभिप्रायावरून शासनाकडून परवानगी घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांना विनंती केली होती. जिल्हाधिकाºयांनी १६ डिसेंबरला हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला.

शासनाने २४ डिसेंबरला धार्मिकस्थळे सुरू करताना कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून घालून दिलेल्या नियमावलीनुसार विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने जिल्हाधिकाºयांनी निर्णय घ्यावा असे कळविले होते. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी २६ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्तांकडे यात्रेबाबत प्रस्ताव सादर केला.  त्यानुसार विभागीय आयुक्तांनी पोलीस आयुक्त व अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून घातलेल्या अटींचे पालन करून परवानगी देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना ८ जानेवारी दिले आहेत.


यण्णीमजनला नाही परवानगी

या अनुषंगाने आयुक्त पी. शिवशंकर यांनी यात्रेतील नियम अटीचा आदेश जारी केला. यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १२ जानेवारी रोजीच्या यण्णीमजनसाठी नंदीध्वज मिरवणुकीला परवानगी नाही. पण ११ जानेवारी रोजी मानाचे सातही नंदीध्वज मंदिर परिसरात सजवून प्रत्येक नंदीध्वजासोबत ५ प्रमाणे ३५ व्यक्ती व १५ पुजारी अशा ५0 जणांना मास्क, फिजीकल डिस्टन्स व सॅनीटायझरच्या वापरासह परवानगी दिली आहे. पंच कमिटीने दोन दिवस आधी ही नावे पोलिसांना द्यायची आहेत.


अक्षता सोहळ्यास असतील ५0 जण

यात्रेच्या दुसºया दिवशी म्हणजे १३ जानेवारीला अक्षता सोहळा आहे. यानिमित्त मंदिरापासून संमतीकट्ट्यापर्यंत ७ नंदीध्वज आणण्यासाठी ३५ मानकरी व अक्षता सोहळ्यासाठी १५ पुजाºयांना परवानगी दिली आहे. हा कार्यक्रम संपल्यावर नंदीध्वज मंदिरात निश्चित केलेल्या जागी जातील  अशाच पद्धतीने १४ जानेवारी रोजी तीळ, हळदीचे उटणे लेपन करून नंदीध्वजांना गंगास्नान करण्यासाठी योगदंडाच्या मानकºयांना परवानगी देण्यात आली आहे.

मानकºयांना पोलीस आयुक्तालयाचा पास राहणार आहे.  
नागफणी, सजावटीस नाही परवानगी
नंदीध्वज मंदिर परिसरात निश्चित केलेल्या ठिकाणी राहतील. धार्मिक विधीसाठी मंदिर परिसरात नेण्यास परवानगी राहिल. नागफणी व इतर सजावट करून मिरवणुकीस बंदी असेल. होम विधीसाठी होम मैदानावर परवानगी असलेल्या ५0 जणांना जाता येईल. १५ जानेवारी रोजी शोभेचे दारूकाम व १६ जानेवारी रोजी होणाºया कप्पडकळ्ळी कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली आहे. 
मंदिर राहणार बंद
यात्रा काळात श्री सिद्धेश्वर मंदिर बंद राहणार आहे. पंच कमिटीने भाविकांना लाईव्ह दर्शनाची सोय करावी. यात्रा काळात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी देवस्थानने परिसरात स्वत:चे सुरक्षा रक्षक नेमावेत. मंदिर परिसर व शहरात पोलीस आयुक्तालय स्वतंत्र बंदोबस्त लावतील.

Web Title: Siddheshwar Yatra at Solapur; Nandi flag procession canceled, devotees barred from entering during Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.