धक्कादायक; दारू पिऊन त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा; सांगोला तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 04:37 PM2021-01-31T16:37:25+5:302021-01-31T19:27:07+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Shocking; Wife removes thorn from drunken husband; Incidents in Sangola taluka | धक्कादायक; दारू पिऊन त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा; सांगोला तालुक्यातील घटना

धक्कादायक; दारू पिऊन त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा; सांगोला तालुक्यातील घटना

Next

सांगोला : दारू पिऊन सतत त्रास देत असल्याने मानलेल्या पत्नीने तिच्या दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने काठीने डोक्‍यात मारहाण करून पतीचा खून केला. दरम्यान, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह स्वतः राहत असलेल्या पालाच्या घरात खड्डा खोदून गाढला. हा प्रकार १० ते १२ दिवसांपूर्वी नाझरा (ता. सांगोला) येथे घडला आहे.

अल्‍पवयीन पुतण्याच्या सांगण्यावरून खुनाचा गुन्हा उघडकीस आला असून पोलिसांनी या खूनप्रकरणी मुलगा बाबासाहेब पुंडलिक शिंदे यांच्या फिर्यादीवरून सून कासाबाई आकाश शिंदे (वय ३५) व दोन अल्पवयीन मुले या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.  मृत आकाश शिंदे हा गोसावी समाजातील असून गावोगावी भिक्षा मागून व भंगार विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी करीत आहेत.

Web Title: Shocking; Wife removes thorn from drunken husband; Incidents in Sangola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.