Shocking; Student suicide by strangulation | धक्कादायक; गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या
धक्कादायक; गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

ठळक मुद्दे- सोलापूर शहरातील न्यु पाच्छा पेठ येथील घटना- मयत समर्थ मसुती हा बारावीच्या वर्गात शिकत होता- घटनेची माहिती मिळताच अशोक चौक पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल

सोलापूर : न्यू पाच्छा पेठ येथील शारदा किड्स स्कूलच्या इमारतीमध्ये राहत्या खोलीत गळफास घेऊन विद्यार्थ्याने आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी बाराच्या सुमारास उघडकीस आला.

समर्थ श्रीशैल मसुती (वय १८, रा. समता नगर, स्टेशन रोड, अक्कलकोट) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. समर्थ मसुती हा कॉलेजमध्ये बारावीच शिक्षण घेत होता. तो न्यू पाच्छा पेठ भाजी मंडई येथील शारदा किड्स शाळेच्या इमारतीमध्ये मित्रांसमवेत रूमवर राहत होता. बुधवारी सकाळी रूममधील सर्व मित्र कॉलेजसाठी निघून गेले होते.

दरम्यान, समर्थ मसुती याने कोणी नसल्याचे पाहून रूममध्ये छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन गळफास घेतला. आत्महत्येचे कारण समजले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली़ श्रीशैल याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबतची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

 


Web Title: Shocking; Student suicide by strangulation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.