धक्कादायक; सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 09:52 AM2020-08-13T09:52:18+5:302020-08-13T09:52:57+5:30

भोसे गाव झाले पोरके; कुटुंबातील तिसरा मृत्यू

Shocking; Solapur District NCP District Working President Rajubapu Patil passed away | धक्कादायक; सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे निधन

धक्कादायक; सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे निधन

googlenewsNext

करकंब : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे रात्री एक वाजता सोलापूर येथील  खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले. एक ऑगस्ट रोजी त्यांचे चुलते अनंतराव पाटील तर आठ ऑगष्ट रोजी बंधू महेश पाटील यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता काळाने राजूबापू पाटील यांच्यावरच झडप घातली असून भोसे गाव पोरके झाले आहे. संपूर्ण पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.


भोसे येथील पाटील घराण्याने शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून राजकीय वाटचाल चालू ठेवली होती. (कै.) यशवंतभाऊ पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पहिले अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर राजूबापू पाटील यांनी २००४ साली अपक्ष म्हणून पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढविताना पासष्ट हजार मते मिळविली होती. शिवाय त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचे सभापती म्हणून काम पाहिले होते. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणूनही त्यांनी भरीव योगदान दिले होते. सध्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत असताना त्यांनी भोसे येथे स्वतःचा 'कृषीराज शुगर' नावाचा कारखानाही काढला होता. त्याचे दोन गळित हंगाम ही यशस्वीपणे पार पडले आहेत.


राजूबापू पाटील दररोज सकाळी नऊ ते बारा हा तीन तासांचा वेळ केवळ ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी देत असत. त्यामुळे येथिल तक्रारी अभावानेच पोलिस ठाण्यापर्यंत जायच्या. पण आज त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने गावाचा पालनकर्ता हरपल्याने संपूर्ण गाव पोरके झाल्याची भावना परिसरात पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी पंचायत समिती सदस्या प्रफुल्लता पाटील,  मुलगा उपसरपंच गणेश पाटील, एक भाऊ, मुलगी, जावई, चुलते असा परिवार आहे.

Web Title: Shocking; Solapur District NCP District Working President Rajubapu Patil passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.