धक्कादायक; सोलापुरात एका दिवसात आढळले ४८ कोरोना बाधित रुग्ण

By appasaheb.patil | Published: May 10, 2020 07:42 PM2020-05-10T19:42:07+5:302020-05-10T19:44:30+5:30

आज ९ पोलीसांचा अहवाल पॉझिटिव्ह ; एकूण रुग्णसंख्या झाली २६४...!

Shocking; In one day, 48 corona infected patients were found in Solapur | धक्कादायक; सोलापुरात एका दिवसात आढळले ४८ कोरोना बाधित रुग्ण

धक्कादायक; सोलापुरात एका दिवसात आढळले ४८ कोरोना बाधित रुग्ण

Next
ठळक मुद्देआज ९ पोलीसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला केगांव केंद्रातून १४८ जणांना मुदत संपल्यानं घरी सोडण्यात आलंसोलापूरात ही एका दिवसातील आजवरची सर्वात मोठी पॉझिटिव्ह संख्या

सोलापूर- : सोलापूरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २६४ वर पोहोचली आहे. आज तब्बल ४८ पॉझिटिव्ह रूग्ण एका दिवसात मिळून आले आहेत. मृतांची संख्या १४ च आहे त्यात वाढ झालेली नाही.

आत्तापर्यंत एकूण ३१२४ जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले यातील २९७२ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात २७०८ निगेटिव्ह तर २६४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज एका दिवसात १३२ अहवाल प्राप्त झाले यातील ८४ अहवाल निगेटिव्ह तर ४८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापूरात ही एका दिवसातील आजवरची सर्वात मोठी पॉझिटिव्ह संख्या आहे. आज ४८ जणांत २९ पुरूष तर १९ महिलांचा समावेश आहे. इकडे आज केगांव केंद्रातून १४८ जणांना मुदत संपल्यानं घरी सोडण्यात आलं तर रूग्णालयातून १२ जणांना घरी सोडण्यात आलं आहे. आज ९ पोलीसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे हे बहुतेक सर्व ग्रामीण पोलीस दलातील आहेत.

आज ज्या भागातून रूग्ण

मिळाले ते भाग पुढीलप्रमाणे

- संजीवनगर एमआयडीसी, गजानन नगर जुळे सोलापूर, बजरंग नगर होटगी रोड, सम्राट चौक आंबेडकर उद्यानजवळ, मंत्री चंडक पोलीस कॉलनी, रविवार पेठ, पोलीस वसाहत मुरारजी पेठ, समृध्दी हेरिटेज जुळे सोलापूर, निर्मिती टॉवर मोदी खाना, अश्विनी हॉस्पिटल ग्रामीण कुंभारी, लोकसेवा शाळेजवळ, बुधवार पेठ मिलिंद नगर, तेलंगी पाच्छा पेठ, तुळशांती नगर विडी घरकुल, सिध्दार्थ चौक कुमारस्वामी नगर, निलम नगर, मोदीखाना, गवळी वस्ती कुंभारी रोड, कुंभारी नाका, सिव्हील हॉस्पिटल कॉर्टर, मुलींचे वसतीगृह होटगी नाका, सहारा नगर मजरेवाडी, शिवाजीनगर मोदी, पाटकूल मोहोळ, धाकबाभुळगांव मोहोळ, सावळेश्वर मोहोळ येथील प्रत्येकी १ रूग्ण मिळाला आहे तर सिध्देश्वर पेठ येथे ६ पुरूष, २ महिला, सदर बझार लष्कर येथे २ पुरूष, २ महिला, शास्त्रीनगर येथे ३ पुरूष, ४ महिला, हुडको कॉलनी कुमठा नाका १ पुरूष, १ महिला यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या २६४ मध्ये १५२ पुरूष तर ११२ महिला आहेत. मृतांची संख्या १४ आहे तर रूग्णालयातून आत्तापर्यंत ४१ जण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्हाधिकारी प्रशासनाकडून हि माहिती देण्यात आली. 

Web Title: Shocking; In one day, 48 corona infected patients were found in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.