धक्कादायक; मोहोळच्या कोव्हिड सेंटरला फक्त एकच कर्मचारी; महिला रुग्णांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:16 AM2020-07-04T11:16:12+5:302020-07-04T11:16:43+5:30

त्या महिलेच्या लावला जिल्हाधिकाऱ्यांना फोन; नातेवाईकांच्या संतापानंतर जिल्हाधिकाºयांनी घेतली दखल...!

Shocking; Mohol's Covid Center has only one staff member; Saseholpat of female patients | धक्कादायक; मोहोळच्या कोव्हिड सेंटरला फक्त एकच कर्मचारी; महिला रुग्णांची ससेहोलपट

धक्कादायक; मोहोळच्या कोव्हिड सेंटरला फक्त एकच कर्मचारी; महिला रुग्णांची ससेहोलपट

Next

सोलापूर : मोहोळच्या महिला रुग्णांची शुक्रवारी रात्री प्रशासनाकडून परवड झाली. संतप्त झालेल्या ‘त्या’ रुग्णांनी फोन केल्यावर जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली व चौकशी केल्यावर मोहोळला कोव्हिड सेंटर नावालाच आसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 


मोहोळमधील तीन पॉझीटीव्ह महिला रुग्णांना आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी उपचारासाठी ताब्यात घेतले. या पथकाने त्यांना अ‍ॅम्बुलन्समधून सिव्हिल हॉस्पीटलमध्ये दाखल केले. शहर व जिल्ह्यातून रुग्ण वाढल्याने या तीन रुग्णांना सिव्हिलच्या डॉक्टरांनी केटरिंग कॉलेजमधील कोव्हिड सेंटरमध्ये रेफर केले. पण या सेंटरमध्ये आधीच ६४ रुग्ण अ‍ॅडमिट व शुक्रवारी दक्षिण सोलापुरातील १८ रुग्णांना उपचारास दाखल करण्यात येणार असल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना अ‍ॅडमिट करण्यास नकार दिला. त्यामुळे या तिन्ही महिला आता कुठे जावे या विवंचनेत तेथेच प्रतिक्षेत थांबल्या.

नातेवाईकांना ही माहिती मिळताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांना संपर्क केला. त्यावर जमादार यांनी प्रांत अधिकारी ज्योती पाटील यांना संपर्क करून या रुग्णांना दाखल करून घेण्याची विनंती केली. पण हे कोव्हिड सेंटर दक्षिण तालुक्यासाठी असल्याने व रुग्ण वाढणार असल्याने त्यांनी जमादार यांच्या विनंतीस नकार दिला. 
त्यामुळे या तीन रुग्णांना पुन्हा सिव्हिलमध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना अ‍ॅडमिट करून घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे या महिला पुन्हा सिव्हिल हॉस्पीटलच्या फिवर ओपीडीसमोर प्रतिक्षेत बसल्या.  त्यातील एका महिला रुग्णांने थेट जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना संपर्क करून उपचारासाठी ससेहोलपट होत असल्याची कैफीयत मांडली. जिल्हाधिकाºयांनी दखल घेत त्यांच्या उपचाराची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. 


मोहोळ कोणाच्या भरवश्यावर
आत्तापर्यंत मोहोळमध्ये आढळलेले रुग्ण थेट सिव्हिल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे मोहोळला कोव्हिड सेंटर आहे की नाही हे कोणाच्या लक्षात आलेच नाही. शुक्रवारी सर्वांनी टोलवाटोलवी केल्यावर मोहोळचे वैद्यकीय अधिकारी पात्रुडकर यांना महसूलच्या अधिकाºयांनी जाब विचारला. तुमच्या तालुक्यासाठी कोव्हिड सेंटर कोठे आहे विचारताच पात्रुडकर यांना उत्तरच देता आले नाही.  
--------------–------------
कोव्हिड सेंटर सुरू केले पण एकच कर्मचारी दिला आहे. पॉझीटीव्ह रुग्ण आढळला तर त्याला नेण्यासाठी वाहन नाही. आरोग्य केंद्राच्या मदतीवर काम सुरू आहे. कर्मचारी व वाहन मागणीबाबत पाठपुरावा सुरू आहे. 

डॉ. अरुण पात्रुडकर, वैद्यकीय अधिकारी

Web Title: Shocking; Mohol's Covid Center has only one staff member; Saseholpat of female patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.