धक्कादायक; शेततळ्यात पडून पती-पत्नीचा मृत्यू; सांगोला तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 02:23 PM2021-09-20T14:23:06+5:302021-09-20T14:33:51+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Shocking; Husband and wife die after falling on farm; Incidents in Sangola taluka | धक्कादायक; शेततळ्यात पडून पती-पत्नीचा मृत्यू; सांगोला तालुक्यातील घटना

धक्कादायक; शेततळ्यात पडून पती-पत्नीचा मृत्यू; सांगोला तालुक्यातील घटना

googlenewsNext

सांगोला : शेततळ्यात सायफन टाकताना पाय घसरून पडलेल्या पत्नीला वाचविताना पती-पत्नीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास धायटी (ता. सांगोला येथील (पुजारी वस्ती) येथे घडली . शीतल मल्हारी पुजारी (वय २२) व मल्हारी बाळू पुजारी  (वय ३०) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.
धायटी येथील मल्हारी पुजारी यांची पत्नी  शीतल या आज सकाळी ७ च्या सुमारास शेततळ्यात सायपन टाकत असताना तिचा पाय घसरून पाण्यात पडली. यावेळी बुडणार्‍या पत्नीला वाचवण्यासाठी पती मल्हारीने शेततळ्यात उडी घेतली मात्र शेततळ्याच्या शेवाळलेल्या पाण्यामुळे दोघांनाही वर न येता आल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत सांगोला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Shocking; Husband and wife die after falling on farm; Incidents in Sangola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.