बेडची वाट न पाहता रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी रस्त्यावरच लावले ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 01:00 PM2021-04-22T13:00:25+5:302021-04-22T13:02:07+5:30

करमाळा तालुका : बेड फुल्ल, मंगल कार्यालये, पालिका हॉल ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू

Shocking; Doctors put oxygen on the road to save lives without waiting for the bed | बेडची वाट न पाहता रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी रस्त्यावरच लावले ऑक्सिजन

बेडची वाट न पाहता रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी रस्त्यावरच लावले ऑक्सिजन

googlenewsNext

नासीर कबीर

करमाळा : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत गेल्या आठ दिवसांपासून दररोज ९० ते १०० बाधित रुग्ण आढळून येत आहेत. करमाळ्यात कोरोनाबाधितांच्या इलाजासाठी २७५ बेडची क्षमता असताना सध्या दुप्पट ५०२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सिजनसह कोविड केअर सेंटर हाउसफुल आहेत.
अशावेळी एका खासगी डॉक्टरांनी बेडची वाट न पहाता त्यांचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावरच ऑक्सिजन लावले अन्‌ मग त्याला पुढील उपचारासाठी रवाना केले.

करमाळा प्रशासनाकडून नगरपालिकेचे गाळे, मंगल कार्यालये, हॉल ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. उपजिल्हा रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने स्ट्रेचरवर ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. करमाळ्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात १५० व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला ८०, असे एकूण २३० क्षमतेचे दोन कोविड केअर केंद्र आहेत. चव्हाण महाविद्यालयात २९५, तर आंबेडकर प्रशालेत १६२, असे क्षमतेपेक्षा दुप्पट बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तीन डेडिकेटेड कोविड केंद्रे आहेत. उपजिल्हा रुग्णालयात १० बेड, कमलाई हॉस्पिटल २५ बेड, शहा हॉस्पिटल येथे १० बेड उपलब्ध केले आहेत.

करमाळ्यात एकाही रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. उपचारसाठी बार्शी, अहमदनगर येथे हलवावे लागत आहे. तेथे गेल्यानंतरही बेड उपलब्ध नसल्याने रुग्णाचा जीव जात आहे. करमाळ्यात ऑक्सिजन बेड वाढवावेत.
-बबन आरणे, नागरिक

सध्याच्या दोन कोविड केअर सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रशासनाने बाजार समितीचा हॉल, करमाळा नगर परिषदेच्या गाळ्यासह शहरातील मंगल कार्यालये ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काही स्वयंसेवी संस्था व नेतेमंडळी स्वत: पुढाकार घेऊन कोविड सेंटर सुरू करू इच्छित आहेत.
-समीर माने, तहसीलदार

उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधितावर इलाजासाठी १० बेडला ऑक्सिजनची सोय असून, सर्व बेड गेल्या आठ दिवसांपासून फुल आहेत. तातडीच्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्ट्रेचरवर झोपवून ऑक्सिजन देऊन इलाज केला जात आहे.
-डॉ. अमोल डुकरे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय

Web Title: Shocking; Doctors put oxygen on the road to save lives without waiting for the bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.