सोलापुरातील श्राविक संस्थेच्या अध्यक्षा विद्युलताभून शहा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 04:52 PM2020-05-27T16:52:25+5:302020-05-27T18:30:55+5:30

कुमठे येथील जैन समाज व भारतीय जैन संघटनेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

Shah dies of electrocution | सोलापुरातील श्राविक संस्थेच्या अध्यक्षा विद्युलताभून शहा यांचे निधन

सोलापुरातील श्राविक संस्थेच्या अध्यक्षा विद्युलताभून शहा यांचे निधन

Next

सोलापूर : सोलापूर श्राविका संस्था नगर सोलापूरच्या  अध्यक्षा अ ब्र. विद्युलता भून हिराचंद शहा (वय ९७) यांचे बुधवार २७ मे २०२० रोजी निधन झाले. 
दरम्यान,  क्षेत्र १००८ श्री चंद्रप्रभू दिगम्बर जैन मंदिर कुमठे येथील जैन समाज व भारतीय जैन संघटनेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

विद्युलता शहा यांनी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचा स्वीकार करून स्व.पद्मश्री पंडिता सुमतीबाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली उमाबाई श्राविकेच्या मुख्याध्यापिका, प्राचार्य या पदापासून संस्थेच्या अध्यक्षपदापर्यंत कार्यभार सांभाळला. त्या जैन शास्त्रानुसार सप्तम प्रतिमाधारी होत्या.  संस्कृत पंडिता, जैन तत्त्वज्ञानाच्या अभ्यासिका, साहित्यिक, महाविदुषी होत्या. त्यांना महाकवी कालिदास संस्कृत पुरस्कार, महिलारत्न पुरस्कार, साहित्य क्षेत्रात सन्मानाने गौरविले होते. त्यांनी आयुष्यभर महिलाच्या कल्याणासाठी व्रतस्थपणे कार्य केले. विधवा, परित्यक्ता, अनाथ महिलांना त्यांनी स्वावलंबी बनवले. आपल्या मासिक वेतनातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या समाजोद्वाराच्या कार्यासाठी निधी दिला आहे.


श्राविका संस्थेचे सचिव हर्षवदन शहा, शिरीष शहा, गिरीश शहा, डॉ.महावीर शास्त्री, विश्वस्त अतुल शहा, अंजली शहा, डॉ.मेहता, सुकुमार मोहोळे, मुख्याध्यापिका राखी देशमाने यांनी श्रद्धांजली समर्पित केली.


कुमठे जैन समाजाच्या वतीने श्रद्धांजली
श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर कुमठे येथे जैन समाजाच्या वतीने व भारतीय जैन संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. मंदिराच्या जीर्णोद्धार कामामध्ये विद्युलता भुन यांनी योगदान असून त्यांनी जीर्णोद्धारासाठी खुप प्रयत्न केले, असे अध्यक्ष श्याम पाटील यांनी सांगितले. यावेळी वालचंद पाटील, नितीन कासार, संजय पानपट आदींनी श्रद्धांजली वाहिली.
जैन कासार विकास प्रतिष्ठानच्या वतीनेही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अध्यक्ष कांतीलाल नळे, संजय मधुकर कंदले, विनायक टोणगे, हुकुमचंद हेसे, माणिक व्यवहारे उपस्थित होते.

कुमठे येथील अतिशय क्षेत्र १००८ चंद्रप्रभू जैन मंदिर जीर्णोद्धार कामांमध्ये विद्युलता भुंन यांनी मोठे योगदान दिले असून त्यांच्या प्रयत्नातूनच मंदिराच्या जिर्णोद्धारच्या कामाला गती मिळाली अशी प्रतिक्रिया मंदिर समितीचे अध्यक्ष शाम पाटील यांनी व्यक्त केली. 
यावेळी मंदिर समितीचे सचिव वालचंद पाटील, नितीन कासार, संजय पानपट, अक्षय शहा, वैभव पाटील, महावीर पानपट यांचाही सहभाग होता. 

Web Title: Shah dies of electrocution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.