संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील रस्ते वाहतूक बंद; अत्यावश्यक सेवेसाठी पर्यायी रस्ते

By appasaheb.patil | Published: August 4, 2020 11:50 AM2020-08-04T11:50:46+5:302020-08-04T11:53:07+5:30

राज्यसरहद्दीवरील १७८ रस्तेही केले बंद; अत्यावश्यक सेवेसाठी पर्यायी रस्ते चालू

Road closures in Solapur district during curfew; Alternative routes for essential services | संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील रस्ते वाहतूक बंद; अत्यावश्यक सेवेसाठी पर्यायी रस्ते

संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील रस्ते वाहतूक बंद; अत्यावश्यक सेवेसाठी पर्यायी रस्ते

Next
ठळक मुद्देअत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा यांच्यासाठी ३१ पर्यायी रस्ते चालू राज्यसरहद्दीवरील २०९ रस्त्यापैकी १७८ रस्ते बंद राहतीलअक्कलकोट विभागातील आंतरजिल्हा व आंतरराज्य सिमा बंद राहतील

सोलापूर : सोलापूर शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग पाहता ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या काळात सोलापूर ग्रामीण भागातील शहराला जोडून ९ तर  आंतरजिल्हा व आंतरराज्य सरहद्दी वरील १७८गावातील रस्ते वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.

ग्रामीण भागात संचारबंदी परिणामकारक होण्यासाठी, सोलापूर शहरातील लोक ग्रामणी भागात जावून कोरोना संसर्ग वाढवू नयेत, बाहेरून लोकांचे आगमन आणि निर्गमन होऊ नये, यासाठी गावाला जोडणारे रस्ते बंद करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा, शासनाने परवानगी दिलेल्या सर्व सेवासुविधा पुरवविणाºया आस्थापनांचे वाहतुकीच्या वाहनांकरीता पयार्यी मार्ग वाहतुकीसाठी सुरु राहतील असे पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे. 

अक्कलकोट विभागातील आंतरजिल्हा व आंतरराज्य सिमा बंद राहतील. ग्रामीण भागात सोलापूर,बार्शी, करमाळा उपविभाग (माढा तालुका), करमाळा तालुका, अकलूज, मंगळवेढा विभाग (सांगोला तालुका), मंगळवेढा तालुका या भागातील राज्यसरहद्दीवरील २०९ रस्त्यापैकी १७८ रस्ते बंद राहतील. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा यांच्यासाठी ३१ पर्यायी रस्ते चालू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
------------
शहरानजीकचे बंद करण्यात आलेले रस्ते...

  • हिरज ते विद्यापीठजवळ पुणे हायवे रोडला मिळणारा रस्ता
  • तिºहे ते शिवणी
  • केगांव ते खेड अंतर्गत रस्ता
  • हगलुर ते दहिटणे
  • पाथरी ते बेलाटी रस्ता
  • सोरेगांव ते डोणगांव ते नंदूर
  • सोरेगांव ते समशापूर
  • सोरेगांव ते डोणगांव ते तेलगांव
  • विडी घरकुल कुंभारी ते विजयनगर मार्गे सोलापूर

--------------
पर्यायी रस्ते..........

  • समशापूर ते हत्तूर
  • नंदुर ते सोरेगांव
  • पाथरी ते तिºहे
  • तिºहे ते सोलापूर
  • शिवणी ते हिरज
  • खेड ते बाळे
  • हगलूर ते तुळजापूर रोड
  • तेलगांव ते पाथरी
  • क्रांती चौक ते मेनरोड (सोलापूर अक्कलकोट)

Web Title: Road closures in Solapur district during curfew; Alternative routes for essential services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.