सेवानिवृत्त पोलिसांच्या कट्ट्यावर चर्चा होतेय कर्तव्याचीच म्हणतात, आजही निष्ठा ‘सद्रक्षणाय..’च्या ब्रीदवाक्याशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 02:43 PM2019-08-21T14:43:44+5:302019-08-21T14:45:46+5:30

सेवेतील आठवणींना मिळतो उजाळा; कर्मचाºयांबरोबर रिटायर्ड अधिकारीही येतात एकत्र

Retired police are on the verge of being called on duty, even today, with loyalty to the 'General Secretary'. | सेवानिवृत्त पोलिसांच्या कट्ट्यावर चर्चा होतेय कर्तव्याचीच म्हणतात, आजही निष्ठा ‘सद्रक्षणाय..’च्या ब्रीदवाक्याशी

सेवानिवृत्त पोलिसांच्या कट्ट्यावर चर्चा होतेय कर्तव्याचीच म्हणतात, आजही निष्ठा ‘सद्रक्षणाय..’च्या ब्रीदवाक्याशी

googlenewsNext
ठळक मुद्दे पोलीस खात्यात काम करून सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये पोलीस कॉन्स्टेबलपासून पोलीस अधीक्षकापर्यंतच्या अधिकाºयांचा समावेश एखाद्या पोलीस कर्मचाºयावर जर अन्याय झाला असेल तर त्याची सखोल माहिती घेतातबहुतांश गुन्ह्याच्या तपासात ही मंडळी सध्याच्या पोलिसांना मदत व मार्गदर्शन करीत आहेत

संताजी शिंदे 

सोलापूर : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन आयुष्यभर जनतेच्या सेवेसाठी काम केलेले सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी व अधिकारी वयाची सत्तरी ओलांडली तरी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, आम्ही आजही तयार असल्याचे मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात. सेवानिवृत्त पोलिसांच्या कट्ट्यावर बसलेली मंडळी एकत्र येऊन शेवटपर्यंत जनतेची सेवा हेच आमचे कर्तव्य अशी चर्चा करतात. 

शहर पोलीस आयुक्तालय स्थापने पूर्वीपासून कामावर असलेले आणि गेल्या ५ ते १० वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या माजी पोलीस कर्मचारी व अधिकाºयांचा कट्टा भूतकाळातील आठवणींना उजाळा देत आहे. अशोक चौक पोलीस चौकीच्या बाजूला व शहर पोलीस मुख्यालयासमोरील कट्ट्यावर ही मंडळी दररोज सकाळी व संध्याकाळी जमतात. ५० पेक्षा जास्त सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी व अधिकारी एकत्र येतात. शहराच्या गुन्हेगारीवर चर्चा करतात, आपले अनुभव सांगून गुन्ह्याचा तपास कसा झाला पाहिजे यावर आपले मत सांगतात. आपल्यासोबत काम केलेल्या व सध्या कर्तव्यावर असलेल्या सहकाºयाला मार्गदर्शन करतात. 

सेवानिवृत्तीनंतर सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, नातवांना शाळेत सोडणे, घरचा भाजीपाला आणून देणे, सकाळी ९ ते १० दरम्यान कट्ट्यावर येऊन सहकारी मित्रांसमवेत गप्पा मारणे. दुपारी घरी जाणे आराम करणे, राहिलेली कामे करणे आणि पुन्हा सहकाºयांसोबत वेळ घालवणे अशी दिनचर्या असलेल्या मंडळींमधला पोलीस आजही जागृत आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी त्यांच्या कार्यकाळात सेवानिवृत्त कर्मचाºयांना बोलावून, वाहतूक शाखेच्या पोलिसांना मार्गदर्शन करण्यास सांगितले होते. बहुतांश सेवानिवृत्त कर्मचाºयांनी आपले कर्तव्य समजून तत्काळ होकार दिला होता. 

कॉन्स्टेबलपासून एस.पी.पर्यंतचा समावेश
- पोलीस खात्यात काम करून सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये पोलीस कॉन्स्टेबलपासून पोलीस अधीक्षकापर्यंतच्या अधिकाºयांचा समावेश आहे. ही मंडळी दररोज एकमेकांच्या संपर्कात असतात. एखाद्या पोलीस कर्मचाºयावर जर अन्याय झाला असेल तर त्याची सखोल माहिती घेतात. झालेला अन्याय खरा असेल तर त्याच्या बाजूने उभे राहतात, पोलीस आयुक्तांपासून गृहमंत्र्यांपर्यंत जाऊन संबंधितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. १२ ते १८ घंटे काम करून कर्तव्य पार पाडलेली ही मंडळी आज निवांत असली तरी त्यांच्यातील पोलीस मात्र अद्याप जागृत आहेत. बहुतांश गुन्ह्याच्या तपासात ही मंडळी सध्याच्या पोलिसांना मदत व मार्गदर्शन करीत आहेत. 

पोलिसांचा आदर कमी होतोय : किसनराव उबाळे
- आम्ही सेवेत असताना पोलिसांचा एक मोठा दबदबा होता. आज राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगार आपण काही केलं तरी लगेच बाहेर येतो, अशा मानसिकतेमध्ये आहेत. शहरातील गल्लीबोळात थिल्लरपणा वाढला आहे, किरकोळ गोष्टींवरून मोठे गुन्हे होत आहेत. शांतता कमिटीमध्ये असणारे काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत. सध्या कर्मचारी देखील कारवाई करण्यास घाबरत आहेत, कायद्याचा हिसका दाखवला की निलंबनाची तयारी ठेवावी लागते. पोलिसांबद्दल असलेली आदरयुक्त भीती सध्या कमी झाली आहे, अशी खंत सेवानिवृत्त फौजदार किसनराव उबाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

Web Title: Retired police are on the verge of being called on duty, even today, with loyalty to the 'General Secretary'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.