साडेबारापर्यंत ५६ ग्रामपंचायतींचा निकाल लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:20 AM2021-01-17T04:20:46+5:302021-01-17T04:20:46+5:30
सांगोला तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींसाठी शांततेत व चुरशीने मतदान पार पडले. १८ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर ...
सांगोला तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींसाठी शांततेत व चुरशीने मतदान पार पडले. १८ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
पहिल्या फेरी : अचकदाणी, लक्ष्मीनगर, भोपसेवाडी, तरंगेवाडी, आगलावेवाडी, बुरंगेवाडी, बुद्धेहाळ, किडेबिसरी. दुसरी फेरी : नराळे, डिकसळ, हटकर मंगेवाडी, राजुरी, मानेगाव, निजामपूर, देवळे, बामणी, हलदहिवडी. तिसरी फेरी : हणमंतगाव, लोणविरे, खिलारवाडी, लोटेवाडी, धायटी, मांजरी (देवकतेवाडी). चौथी फेरी : गौडवाडी, सोमेवाडी, पाचेगांव बु., यलमार मंगेवाडी, वासूद. पाचवी फेरी : वाकी शिवणे, एखतपूर, जवळा. सहावी फेरी : अकोला, हंगिरगे, पारे, हातीद, जुजारपूर. सातवी फेरी : अजनाळे, नाझरा, वझरे, कटफळ, महिम. आठवी फेरी : संगेवाडी, शिरभावी, मेडशिंगी, वाकी घेरडी, उदनवाडी, आलेगाव. नववी फेरी : कमलापूर, जुनोनी, घेरडी, वाणीचिंचाळे. दहावी फेरी : महूद, इटकी, डोंगरगाव. अकरावी फेरी : कडलास, कोळा अशा पद्धतीने मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी बंदोबस्तासाठी दोन पोलीस निरीक्षक, १० सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, १०० पोलीस व ५० होमगार्ड, सात राज्य राखीव दलाचे कर्मचारी असा बंदोबस्त तैनात केला आहे.