पंढरपूर, करकंब, अकलूज ग्रामीण रुग्णालयास कायाकल्प पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 03:25 PM2020-10-20T15:25:40+5:302020-10-20T15:25:46+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Rejuvenation Award to Pandharpur, Karkamba, Akluj Rural Hospital | पंढरपूर, करकंब, अकलूज ग्रामीण रुग्णालयास कायाकल्प पुरस्कार

पंढरपूर, करकंब, अकलूज ग्रामीण रुग्णालयास कायाकल्प पुरस्कार

googlenewsNext

सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत पंढरपूर, करकंब आणि अकलूज ग्रामीण रुग्णालयास प्रत्येकी एक लाखाचा राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान मिशनचे तांत्रिक सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. राज्यातील ८३ आरोग्य केंद्रांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात सोलापुरातील तीन रुग्णालयांचा समावेश आहे. रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था, स्वच्छता, कर्मचाºयांची उपलब्धता यावरून याचे गुणांकन करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले.

Web Title: Rejuvenation Award to Pandharpur, Karkamba, Akluj Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.