करमाळ्यात रश्मी बागलच ! शिवसेनेने अखेर ए/बी फॉर्म दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 12:24 PM2019-10-02T12:24:09+5:302019-10-02T12:32:20+5:30

विधानसभा निवडणूक; नारायण पाटलांचा पत्ता कापला, अखेर उमेदवारीचा तिढा मिटला

Rashmi Bagal in the crab! The Shiv Sena finally gave the A / B form | करमाळ्यात रश्मी बागलच ! शिवसेनेने अखेर ए/बी फॉर्म दिला

करमाळ्यात रश्मी बागलच ! शिवसेनेने अखेर ए/बी फॉर्म दिला

Next
ठळक मुद्दे- करमाळा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारीचा तिढा सुटला- तानाजी सावंत हे बागल यांच्या उमेदवारी आग्रही होते- रश्मी बागल या करमाळा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

सोलापूर : शिवसेनेचा करमाळा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा बुधवारी मिटला. विद्यमान आमदार नारायण पाटील यांना डावलून शिवसेनेने रश्मी बागल यांना उमेदवारी दिली आहे.

रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत  प्रवेश केला होता. जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत हे बागल यांच्या उमदेवारीसाठी आग्रही होते. आमदार नारायण पाटील यांच्यासाठी सोलापूरचे माजी संपर्कप्रमुख तथा खासदार राहूल शेवाळे यांनी ऐनवेळी उडी घेतली. मातोश्रीवर गेली तीन दिवस यावर खलबते झाली. तानाजी सावंत आणि राहूल शेवाळे यांनी चर्चा करुन बुधवारी निर्णय द्यावा, असे उध्दव ठाकरे आदेश दिले होते. पक्षाने अखेर रश्मी बागल यांना उमेदवारी दिली आहे.



 

Web Title: Rashmi Bagal in the crab! The Shiv Sena finally gave the A / B form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.