कोरोनापासून देशाचे रक्षण कर, कोरोनाची लस लवकर मिळू दे; उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 05:45 AM2020-11-26T05:45:43+5:302020-11-26T05:46:31+5:30

कार्तिकी वारी निमित्ताने शासकीय महापूजा संपन्न; यंदा झाला साधेपणाने सोहळा

Protect the country from corona, get corona vaccine soon; Deputy Chief Minister to Vitthal | कोरोनापासून देशाचे रक्षण कर, कोरोनाची लस लवकर मिळू दे; उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे

कोरोनापासून देशाचे रक्षण कर, कोरोनाची लस लवकर मिळू दे; उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे

Next

पंढरपूर : जगावर देशावरचे कोरोनाचे संकट आहे, ते संकट दूर होऊ दे. कोरोनाची लवकर लस मिळू दे असे साकडे राज्यातील सर्व जनतेच्या वतीने विठ्ठलाला घातले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोणामुळे लोक डाऊन पडले आहे. त्यामुळे शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर छोटे-छोटे कामगार, हातावरचे पोट असणारे लोक यांनादेखील काम करता येत नाही. यामुळे त्यांचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न गंभीर होत आहेत. ही परिस्थिती लवकर बदलू दे. कोरोनाचे संकट दूर होऊ दे.

को रोनावर नियंत्रण आणण्यासाठी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बळ मिळू दे, असे साकडे पांडुरंगाकडे घातले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

वेगळे वळण देणाऱ्याला वारकरी संप्रदायाने दिली नाही साथ

वारकर्‍यांची संबंध महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल आहे. त्यामुळे सर्वांना विठ्ठलाच्या दर्शनाची आतुर झालेले असतात. जरी कोरोनाचे संकट असले तरी चर्चेतून चांगल्या पद्धतीचा मार्ग काढण्याचे प्रयत्न करायचा असतो. कोणी याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला तरी वारकरी संप्रदायाने त्याला साथ दिली नसल्याचे पवार यांनी सांगितले.


पंढरपुरातील घाटाच्या कामाची होणार चौकशी 

पंढरपुरातील चंद्रभागा नदी जवळील कुंभार घाट आहे. त्याच्या नजीक नव्याने बांधण्यात आलेला घाट ढासळून ६ जणांचा मृत्यू झाला होता. ही गंभीर बाब आहे. अशा पद्धतीचे विकास कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी लावून कारवाई करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Web Title: Protect the country from corona, get corona vaccine soon; Deputy Chief Minister to Vitthal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.