Positive view of creation, Corona | सृष्टीची पॉझिटिव्ह दृष्टी, कोरोना

सृष्टीची पॉझिटिव्ह दृष्टी, कोरोना

महामारीत दुसऱ्यांदा प्लाझ्मा दान

बार्शी : कोविड प्लाझ्मा हवाय असे अनेक फोन बार्शीतील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी येथे खणखणत आहेत. एकीकडे रुग्णालयात बेड, रेमडेसिविर इंजेक्शनची कमरता जाणवत आहे. तर दुसरीकडे रक्त बाटल्या अन् प्लाझ्माचीही तीच परिस्थिती आहे. त्यामुळेच, प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक डाॅक्टर सातत्याने करत आहेत. त्यात बार्शीतील सृष्टी तम्मेवार हिने कोरोनाच्या कठीण प्रसंगात आपली पॉझिटिव्ह दृष्टी समाजाला दाखवून दिली आहे.

शहरातील भोसले चौक येथील सृष्टी सुधीर तम्मेवार या तरुणीने दुसऱ्यांदा प्लाझ्मा दान करून आपल्यातील धाडसी बाणा दाखवून दिला. कोरोनाच्या लढाईत दोन जीव वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. सृष्टीला सप्टेंबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने उपचार घेत कोरोनावर मात केली. त्यानंतर आता आपण एखाद्याचा जीव वाचविण्याच्या कामी येऊ शकतो, का असा विचार करून तिने ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा प्लाझ्मा दान केला. त्यानंतर आता श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीत जाऊन अँटीबॉडीज चेक केल्यानंतर पहिला प्लाझा डोनेट केला.

विशेष म्हणजे एका प्लाझ्मा डोनेटवर न थांबवता, तिने एका रुग्णाला तातडीचा प्लाझ्मा आवश्यक असल्याचे समजाच, आज दुसऱ्यांदा तिने प्लाझ्मा डोनेट केला आहे.

गतवर्षी बारावी उत्तीर्ण झालेल्या सृष्टीने आपल्या कृतीतून जगण्याची सकारात्मक दृष्टीच दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे सृष्टीचे वडील सुधीर तम्मेवार हेही शतकवीर डोनर असून सुधीर तम्मेवार यांनी १०० वेळा रक्तदान केले आहे. ५० पेक्षा अधिक वेळा प्लेट्सलेट डोनेट केलंय. त्यामुळे वडिलांपासूनच दानशूरतेची भावना तम्मेवार कुटुंबीयांमध्ये रुजल्याचं सृष्टीनं सांगितलं.

फोटो

२२बार्शी-कोरोना

ओळी : दुसऱ्यांदा प्लाझा दान करताना सृष्टी तम्मेवार. त्याप्रसंगी ब्लड बँकेचे अजित कुंकुलोळ, संतोष सूर्यवंशी.

Web Title: Positive view of creation, Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.