Police father dies without seeing daughter's wedding; Corona's first victim in Pandharpur police force | मुलीचं लग्न न बघताच पोलिस वडिलांचा मृत्यू; पंढरपूर पोलिस दलात कोरोनाचा पहिला बळी

मुलीचं लग्न न बघताच पोलिस वडिलांचा मृत्यू; पंढरपूर पोलिस दलात कोरोनाचा पहिला बळी

पंढरपूर : पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे नाईक आमिन आप्पा मुलाणी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोनामुळे पोलीस दलातील अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची पंढरपूरतील ही पहिलीच घटना आहे.

पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अमिन आप्पा मुलाणी (वय ५०, रा. पोलीस लाईन, पंढरपूर) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आमिन मुलाणी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरू होते. या दरम्यान रविवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले व १ मुलगी असा परिवार आहे.

मुलाणी यांच्या मुलीचं नुकतंच लग्न ठरलं होतं आणि काही दिवसांनीच तिचा विवाह होणार होता. परंतु काळाने अचानक मुलाणी यांच्यावर झडप घातली. कुटुंबातील ते एकमेव आधार होते. एकलुत्या एक लेकीचा विवाह सोहळा न बघताच पोलीस वडिलांचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलाणी हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते.

पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी दोघेजण कोरोनामुक्त झाले असून एकाचे असे दुःखद निधन झाले आहे तर एकावर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

Web Title: Police father dies without seeing daughter's wedding; Corona's first victim in Pandharpur police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.