आरक्षणासाठी सोलापुरात धनगर समाजाचे ढोल बजाव...सरकार जगाव... आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:19 PM2020-09-25T12:19:03+5:302020-09-25T12:20:24+5:30

सोलापूर शहरात निघाला मोर्चा; सांगोला, मोहोळ, माळशिरस, पंढरपुरातही आंदोलन

Play the drums of Dhangar Samaj in Solapur for reservation | आरक्षणासाठी सोलापुरात धनगर समाजाचे ढोल बजाव...सरकार जगाव... आंदोलन

आरक्षणासाठी सोलापुरात धनगर समाजाचे ढोल बजाव...सरकार जगाव... आंदोलन

Next
ठळक मुद्दे- आरक्षणाच्या मागणीसाठी आज धनगर समाजाचे आंदोलन- सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आंदोलनास सुरूवात- पंढरपुरात आ. गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली होत आहे आंदोलन

सोलापूर : धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिले यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात धनगर समाजाचे ढोल बजाओ...सरकार जगाओ...आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला.

पंढरपुरात आ़ गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे़ सोलापूर शहरात चार हुतात्मा पुतळ्याशेजारी असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरूवात झाली़ यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

याशिवाय सांगोल्यात तहसिल कार्यालयासमोर धनगर समाज बांधवांनी आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले. सांगोला धनगर समाजाच्यावतीने राजामाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ढोल बजाव..सरकार जगाओ आंदोलनास सुरूवात केली़ यावेळी धनगर समाजाच्यावतीने तहसिलदार, सांगोला पोलिस ठाण्यास विविध मागण्यांचे निवेदन दिले.

 माळशिरस येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरूवात करण्यात आली़ मोहोळ तहसिल कार्यालयासमोर धनगर समाज बांधवांनी आंदोलन केले़ माढयातही आंदोलनास सुरूवात झाली आहे़ कामती बु (ता. मोहोळ) येथे संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज बांधवांनी आंदोलन केले.

Web Title: Play the drums of Dhangar Samaj in Solapur for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.