उपरीत 'कोरोना'ग्रस्त रुग्ण आढळला; रुग्णाच्या संपर्कातील त्या ३६ लोकांचे स्वॅब घेतले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 08:47 PM2020-05-25T20:47:18+5:302020-05-25T20:47:52+5:30

पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांची माहिती; उपरीमधील तो परिसर केला सील...!

A patient with corona was found above; Swabs of those 36 people in contact with the patient ...! | उपरीत 'कोरोना'ग्रस्त रुग्ण आढळला; रुग्णाच्या संपर्कातील त्या ३६ लोकांचे स्वॅब घेतले...!

उपरीत 'कोरोना'ग्रस्त रुग्ण आढळला; रुग्णाच्या संपर्कातील त्या ३६ लोकांचे स्वॅब घेतले...!

Next

पंढरपूर : उपरी (ता. पंढरपूर) येथे मुंबईवरून आलेल्या एकाला 'कोरोना' संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 'कोरोना' पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्या ३६ लोकांचे 'कोरोना'ची चाचणी करण्यासाठी स्वॅब घेण्यात आल्याची माहिती प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यासह मुंबई येथून उपरी (ता. पंढरपूर) आलेल्या लोकांना जिल्हा परिषद शाळेमध्ये कॉरंटाईनवर करून ठेवण्यात आले होते. त्यातील एकाला 'कोरोना'ची लक्षणे आढळून आले होते. त्यानंतर त्याची 'कोरोना' चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला.

यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ३६ लोकांना वाखरी ( पंढरपूर) येथील कोविड केअर सेंटर मध्ये संस्थात्मक कॉरंटाईनवर करण्यात आलेल्या होते. त्या सर्व लोकांचे कोरोनाच्या चाचणीसाठी सोमावरी स्वॅब घेतले आहेत. यांचा अहवाल मंगळवारी समोर येणार आहे.

यावेळी तहसीलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले हे उपस्थित असल्याचे प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

Web Title: A patient with corona was found above; Swabs of those 36 people in contact with the patient ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.