जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकºयांचा उद्रेक; अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 05:19 PM2020-02-12T17:19:19+5:302020-02-12T17:26:11+5:30

सोलापूर जिल्ह्यातील घटना; अगोदर जमिनीचा मोबदला द्या मगच शेतात पाऊल टाका, शेतकºयांचा सवाल

Outbreak of farmers for land compensation; Attempt to burn diesel on a limb | जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकºयांचा उद्रेक; अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकºयांचा उद्रेक; अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्दे- मंगळवेढा परिसरात शेतकरी-ठेकेदाराच्या वादामुळे तणावपूर्ण वातावरण- मंगळवेढा पोलीस ठाण्यात शेतकरी, ठेकेदाराविरूध्द फिर्याद दाखल- नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी भूसंपादन काम वेगात

मंगळवेढा : नागपूर - रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या शेतकºयांच्या जमिनीचा मोबदला न देता पोलीस व महसुल प्रशासनास पुढे करून दंडेलशाहीने महामार्गाचे काम करणाºया दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ठेकेदार व अधिकारी यांच्याविरुद्ध शेतकºयांतुन संतापाचा उद्रेक होत आहे. शेतकºयांकडून दिवसेंदिवस विरोध वाढत असून महामार्गाचे अधिकारी शेतकºयांना दमबाजी करून काम करण्याच्या प्रयत्नात असल्याने गेल्या दोन दिवसात मंगळवेढ्यातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

 दरम्यान बुधवारी सकाळी गणेशवाडी येथील एका शेतकºयाने महामार्गाचे अधिकारी शेतात अवैधरित्या जाऊन काम सुरु करण्याच्या प्रयत्नात असताना अंगावर डिझेल ओतून घेत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आणि हा सर्व प्रकार पोलीस खात्याच्यासमोर घडला.

मंगळवारी सकाळच्या सुमारास खोमनाळ बायपास रस्त्यालगत असलेल्या शेतकºयांच्या शेतात अधिकाºयांनी काम करण्यास सुरूवात केली असता त्या शेतकºयांनी विरोध केल्यानंतर काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते़ अंधळगाव येथील शेतकºयांच्या भुसंपादनाची रक्कम मिळाली नसतानाही सबंधित ठेकेदारांकडून शेतकºयांना दमदाटी व बळजबरीने काम करण्याचा प्रयत्न केला जात असून याचे पर्यवसन एकमेकांना शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडला़ याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात फिर्यादी दिल्या आहेत.



 

Web Title: Outbreak of farmers for land compensation; Attempt to burn diesel on a limb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.