पोलिस आयुक्तांचे आदेश; गल्लीतील गुंडांची लिस्ट बनवा, एक कॉपी माझ्याकडेही द्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:18 PM2020-09-30T12:18:46+5:302020-09-30T12:21:10+5:30

पोलीस आयुक्तांनी दिल्या अधिकाºयांना सुचना : अधिकारी लागले कामाला

Orders of the Commissioner of Police; Make a list of street thugs, give me a copy too ...! | पोलिस आयुक्तांचे आदेश; गल्लीतील गुंडांची लिस्ट बनवा, एक कॉपी माझ्याकडेही द्या...!

पोलिस आयुक्तांचे आदेश; गल्लीतील गुंडांची लिस्ट बनवा, एक कॉपी माझ्याकडेही द्या...!

Next
ठळक मुद्देशहरातील विविध पोलीस ठाण्यात सावकार विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेतबरेचसे अर्ज नावानिशी तसेच निनावी दाखल करण्यात आले आहेतसर्व पोलीस ठाणे अधिकारी आता सतर्क झाले असून आपल्या हद्दीतील लिस्ट तयार करण्याचे काम करत आहेत

सोलापूर : सावकारी आणि मटका प्रकरणातील अनेक बड्या माश्यांवर कारवाई केल्यानंतर आता पोलीस प्रशासनाचे पाय हे गल्लीतील गुंडांकडे वळाले आहेत. शहरात अशांतता पसरवणारे, गल्ली बोळात गुंडागिरी करत सामान्यांना धमकावत फिरणाºयां विरूध्द पोलीस कडक कारवाई करणार आहेत. गल्लीतील गुंडांची लिस्ट तयार करावी आणि त्याची एक प्रत आयुक्तालयाला देण्याच्या सुचना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीसांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आयुक्तांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास सर्व पोलीस अधिकाºयांनासक्त सुचना दिल्या आहेत़ यात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटे मोठे गुंड जे तेथील मोठ्या गुंडांनापकडून त्यांच्या नावे गुंडगिरी करतात. तसेच ज्यांच्या नावे गुन्हे दाखल आहेत, सोबतच असे व्यक्ती जे गुंडा गर्दीचे काम करतात पण त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, अशा सर्वांची माहिती गोळा करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत़ यामुळे सर्व पोलीस ठाणे अधिकारी आता सतर्क झाले असून आपल्या हद्दीतील लिस्ट तयार करण्याचे काम करत आहेत.

दरम्यान मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्तालयाच्यावतीने एक व्हिडीओ प्रसारीत करण्यात आला़ यात पोलीस आयुक्त शिंदे म्हणाले, शहरातील विविध पोलीस ठाण्यात सावकार विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर बरेचसे अर्ज नावानिशी तसेच निनावी दाखल करण्यात आले आहेत. या अर्जांचा ही पोलीस प्रशासनाकडून विचार केला जात आहे. अशा तक्रारदारांनी पोलीस ठाण्यात तसेच शहर निबंधक तसेच जिल्हा सावकारी निबंधकाकडे लेखी तक्रार करावी असेही आयुक्त शिंदे यांनी सांगितले.

नागरिकांनी अवैध व्यवसायांची माहिती द्यावी
मटका प्रकरणातील कारवाईनंतर अशा प्रकारच्या अवैध व्यावसाय करणाºयांवर तडीपार करावे असे अनेक निवेदन येत आहेत, अशा निवेदनाचा पोलीस प्रशासनाकडून विचार सुरू असून त्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात अशा कोणत्याही प्रकारचे अवैद्य उद्योग होत असतील तर अशा उद्योगांची माहिती पोलीस प्रशासनाला देण्याचे आहवान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे़

Web Title: Orders of the Commissioner of Police; Make a list of street thugs, give me a copy too ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.