सोलापुरातील तेलुगू भवनाचे केवळ ‘स्वप्न’च !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 08:08 PM2019-08-30T20:08:41+5:302019-08-30T20:11:35+5:30

भाषेच्या संवर्धनासाठीही प्रयत्न अपुरे; विद्यापीठात अध्यासन सुरू करण्याची मागणी

Only 'dream' of Telugu Bhavan in Solapur! | सोलापुरातील तेलुगू भवनाचे केवळ ‘स्वप्न’च !

सोलापुरातील तेलुगू भवनाचे केवळ ‘स्वप्न’च !

Next
ठळक मुद्देसोलापुरात एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश तेलुगू भाषिक आहेतसध्या तेलुगू भाषेत शिक्षण देणाºया बोटावर मोजण्याइतक्या शाळा आहेततेलुगू भाषेचा गोडवा टिकून राहावा यासाठी सोलापूर विद्यापीठाने अध्यासन सुरू करण्याची मागणी

महेश कुलकर्णी 

सोलापूर : तेलुगू भाषेच्या संवर्धनासाठी सोलापुरात तेलुगू भवन व्हावे, अशी अनेक तेलुगू भाषिकांची अपेक्षा आहे. यासाठी जागा द्यावी म्हणून मनपाकडे अनेकदा प्रस्ताव पाठविण्यात आले, परंतु उदासीन असलेले प्रशासन आणि केवळ ‘मतपेटी’ म्हणून पाहणाºया राजकीय नेत्यांनी याकडे अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे ‘तेलगू भवन’चे स्वप्न अपुरेच राहिले आहे.

सोलापुरात एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश तेलुगू भाषिक आहेत. मराठी भाषेची सेवा करताना मातृभाषा तेलुगूही टिकून राहावी, अशी रास्त अपेक्षा तेलुगू भाषिकांची आहे. सध्या तेलुगू भाषेत शिक्षण देणाºया बोटावर मोजण्याइतक्या शाळा आहेत आणि तेथे शिकणारे विद्यार्थीही बोटावर मोजण्याइतके आहेत. अशा परिस्थितीत तेलुगू भाषेचा गोडवा टिकून राहावा यासाठी सोलापूर विद्यापीठाने अध्यासन सुरू करण्याची मागणी तमाम तेलुगू भाषियांच्या वतीने करण्यात येत आहे. 

पोटासाठी आंध्रप्रदेश आणि कर्नाटकच्या सरहद्दीवरून पावणेदोनशे वर्षांपूर्वी सोलापुरात आलेला विणकर समाज हा तेलुगू भाषिक आहे. पद्मशाली समाजासह जवळपास १८ ते २० जातीचे लोक तेलुगू बोलतात. त्यांना मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी केवळ तीन-चार शाळा आहेत. येथे दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते.  महाविद्यालयीन शिक्षण शहरातील कुठल्याही महाविद्यालयात उपलब्ध नसल्यामुळे तेलुगू भाषिकांना इच्छा असूनही पुढे शिकता येत नाही. यासाठी सोलापूर विद्यापीठाने तेलुगू भाषेचा अभ्यासक्रम सुरू करावा.

हिंदीखालोखाल देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा तेलुगू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शहरात तेलुगू भाषक असूनही या भाषेत शिकणाºयांची संख्या मात्र कमी होत चालली आहे. या भाषेच्या संवर्धनासाठी १९९२ साली स्व. कवी लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी तेलुगू भाषा अभिवृद्धी संघम्ची स्थापना केली. हे मंडळ अजूनही सुरू आहे.

मोडी लिपीत तेलुगू भाषेची १४ मुळाक्षरे !
- मराठी आणि तेलुगू या दोन्ही भाषा सख्ख्या बहिणी आहेत. पूर्वी मराठीजनांकडून वापरली जाणारी मोडी लिपी ही भाषा तेलुगू कवी हेमाद्री यांनी लिहिलेली आहे. मोडी भाषेत प्रत्येक अक्षरात तेलुगूची १४ मुळाक्षरे आहेत. मराठी संतांनीही कानडी आणि तेलुगूमध्ये अनेक अभंग लिहिले आहेत. मातृभाषा तेलुगू असणाºयांची दातृभाषा मराठी आहे. 

बोल्लींचे स्वप्न अपूर्णच !
जीवनभर ‘आंतरभारती’चा वसा घेऊन लेखन करणाºया कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी अनुभवाच्या माध्यमातून मराठी आणि तेलुगू साहित्य समृद्ध केलं. अनेक तेलुगू नाटकं त्यांनी स्वत: मराठी रंगभूमीवर सादर केली; तर मराठी संतांचे गुणगान तेलुगूत गायिले. बोल्ली यांनी आपल्या हयातीत सोलापुरात तेलुगू भवन साकारण्याचे स्वप्न पाहिले होते; शिवाय केवळ सोलापूर जिल्ह्यापुरत्या असलेल्या आपल्या विद्यापीठात तेलुगू भाषा अध्यासन सुरू व्हावे, यासाठीही प्रयत्न केले होते. खरं तर त्यांची ही चळवळ होती. मराठी साहित्यातील या महान कविवर्यांच्या मृत्यूनंतरही तेलुगू भवन आणि अध्यासन सुरू होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही.

तेलुगू भाषा जिवंत राहण्यासाठी तरुण पिढीला ही भाषा लिहिता आणि वाचता येणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने याचे प्रशिक्षण घ्यावे. ही तेलुगू वाचन चळवळ अशीच वृद्धिंगत व्हावी यासाठी  काही दानशूर व्यक्तींनी आणि राजकीय पुढाºयांनी पुढे आले पाहिजे. तेलुगू भवन आणि विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करीत आहोत.
- मल्लिकार्जुन कमटम,
अध्यक्ष, तेलुगू भाषा अभिवृद्धी वाचनालय

Web Title: Only 'dream' of Telugu Bhavan in Solapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.