पहिल्याच दिवशी सोलापूर जिल्ह्यातील केवळ ९२ हजार विद्यार्थी हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 11:46 AM2021-01-28T11:46:14+5:302021-01-28T11:46:20+5:30

३० टक्केच उपस्थिती : ऑनलाईन शिक्षण ऑफलाईनवर; विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत

Only 92,000 students from Solapur district attended on the first day | पहिल्याच दिवशी सोलापूर जिल्ह्यातील केवळ ९२ हजार विद्यार्थी हजर

पहिल्याच दिवशी सोलापूर जिल्ह्यातील केवळ ९२ हजार विद्यार्थी हजर

Next

सोलापूर : प्राथमिक शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी जिल्हयातील ३ लाखपैकी ९२हजार १६९ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. घंटा वाजवित हातात गुलाबाचे फुल घेऊन शिक्षक प्रवेशद्वारावर आले अन हे दृष्य आपल्याजवळील मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी विद्यार्थी पुढे झाले. गेली दहा महिने ऑनलाईन शिक्षण घेणारी मुले आज शाळेत आल्यानंतर आनंदीत झाल्याचे चित्र शाळांमध्ये पहावयास मिळाले.

पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बुधवारी सुरू झाल्या. शिक्षण विभागातर्फे शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. कोरोना महामारीमुळे शाळा गेली दहा महिने बंद होत्या. पालकाच्या संमतीने शाळा सुरू करण्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला. त्याप्रमाणे शाळांचे कामकाज सुरू झाले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एक दिवसाआड पन्नास टक्के हजेरी ठेवण्यात येत आहे. त्याप्रमाणे पहिल्या दिवशी निम्मे विद्यार्थी शाळेत दाखल झाले. शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षकांनी गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत केले. अनेक शाळांनी प्रांगणात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढल्याचे दिसून आले. वर्गात येणाºया विद्यार्थ्यांच्या हातावर सॅनिटायझर व गनद्वारे तपासणी करण्यात येत होती. पण शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह दुणावलेला दिसून आला.

मास्कमुळे ओळख नाही पटली

शाळेत येताना मास्क सक्तीचे असल्याने बºयाच दिवसांनी भेटलेल्या विद्यार्थ्यांची एकमेकांना ओळख पटत नव्हती. वर्गात जात असतानाच अरे..मी तुला ओळखले नाही अशा गमतीत सर्वजण रमल्याचे दिसून आले.

पालकांची संमती आवश्यक होती

पहिल्याच दिवशी ३ लाख १ हजार ५३३ पैकी ९२ हजार १६९ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. पालकाची संमती आवश्यक होती. पण बरेच विद्यार्थी संमतीपत्राविना हजर झाले. त्यांची उपस्थिती हीच पालकांची संमती ग्राह्य धरल्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी संजयकुमार राठोड यांनी सांगितले.

९ हजार शिक्षकांची चाचणी

ग्रामीण भागात गेल्या चार दिवसात ९ हजार ३५७ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये २ हजार २३७ शिक्षकांची अ‍ँन्टीजेन तर ७ हजार १२0 शिक्षकांचे प्रयोगशाळेसाठी स्वॅब घेण्यात आले. प्रयोगशाळेचे अहवाल येण्यास विलंब होत असल्याने बºयाच शिक्षकांची अडचण झाली. पण आत्तापर्यंत २४ शिक्षक पॉझीटीव्ह आले आहेत.

  • एकूण शाळांची संख्या:२३९०
  • आज सुरू झाल्या शाळा: २३७४
  • शाळांमध्ये असलेले शिक्षक: ८६२२
  • आज हजर असलेले शिक्षक: ८४५८
  • कोरोना चाचणी झाली: ८३८४
  • अहवाल झाले प्राप्त: ५४९0
  • पॉझीटिव्ह: २४
  • एकूण विद्यार्थी पटसंख्या: ३0१५३३
  • आज उपस्थित विद्यार्थी: ९२१६९

Web Title: Only 92,000 students from Solapur district attended on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.