पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीमातेचे ऑनलाइन बुकिंग दर्शन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:53 AM2019-12-23T11:53:22+5:302019-12-23T11:55:26+5:30

नाताळनिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी; पदस्पर्श दर्शन रांग धोंडोपंत महाराज मठापर्यंत

Online booking of Vitthal-Rukmini Mahatma in Pandharpur closed | पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीमातेचे ऑनलाइन बुकिंग दर्शन बंद

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीमातेचे ऑनलाइन बुकिंग दर्शन बंद

googlenewsNext
ठळक मुद्देपदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांचे जलद दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून २ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाइन बुकिंग दर्शन सुविधा बंद दर्शन रांग जलद गतीने पुढे जावी, यासाठी खासगी सुरक्षा रक्षकांचीही मदत मंदिर समितीच्या सर्व कर्मचाºयांची रजा आणि साप्ताहिक सुट्टी रद्द

पंढरपूर : सफला एकादशी आणि नाताळनिमित्त अनेक जण सुट्टी घेऊन देवदर्शनासाठी प्रवास करीत आहेत. परिणामी पंढरपुरातही श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे़ लवकर दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने ऑनलाइन बुकिंग दर्शन सेवा बंद केली आहे.

रविवारी एकादशी असल्याने पदस्पर्श दर्शन रांग ही धोंडोपंत महाराज मठापर्यंत गेली होती. दरम्यान, नाताळ सण दोन दिवसांवर आल्याने या सणाच्या सुट्टीच्या निमित्ताने पंढरपूर दर्शनासाठी येणाºया भाविकांची संख्याही वाढली आहे. रविवारी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, नगरप्रदक्षिणा मार्ग भाविकांनी गजबजून गेला होता. 

नाताळ सणाच्या काळात अनेक जण सुट्टी काढून पर्यटन तसेच धार्मिक स्थळांना भेटी देत असतात. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पंढरपूर शहरात राज्य-परराज्यातून दर्शनासाठी भाविक येत आहेत. शहरातील धर्मशाळा, भक्तनिवास भाविकांनी गजबजले आहे. या ठिकाणी माफक दरात चांगली सुविधा मिळत असल्याने अनेक जण मुक्कामी येतात.

 चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा आणि त्यानंतर विठ्ठलाचे पदस्पर्श किंवा मुखदर्शन असा भाविकांचा दिनक्रम असतो. गेल्या तीन दिवसांत पंढरीत येणाºया भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

मंदिर समिती कर्मचाºयांच्या सुट्ट्या बंद
- पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांचे जलद दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून २ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाइन बुकिंग दर्शन सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. दर्शन रांग जलद गतीने पुढे जावी, यासाठी खासगी सुरक्षा रक्षकांचीही मदत घेण्यात येत आहे. मंदिर समितीच्या सर्व कर्मचाºयांची रजा आणि साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

Web Title: Online booking of Vitthal-Rukmini Mahatma in Pandharpur closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.