संस्कृती अन् पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वेचे एक पाऊल पुढे

By appasaheb.patil | Published: February 21, 2020 02:14 PM2020-02-21T14:14:55+5:302020-02-21T14:17:23+5:30

रेल्वे मंत्रालय : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’करिता रेल्वे प्रवासात मिळणार ५० टक्के सवलत

One step further to train culture and tourism | संस्कृती अन् पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वेचे एक पाऊल पुढे

संस्कृती अन् पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वेचे एक पाऊल पुढे

Next
ठळक मुद्दे'एक भारत श्रेष्ठ भारत' अभियान हे देशाच्या सामर्थ्य आणि ऐक्यात महत्त्वाचे घटक बनणार रेल्वे मंत्रालयाने या उपक्रमाकरिता जाणाºया प्रत्येकाला रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचे जाहीर केले ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा उपक्रम देशातील अंतर्गत सांस्कृतिक फरक दूर

सोलापूर : रेल्वे मंत्रालयाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’करिता ५० टक्के विशेष सवलत देण्याचे जाहीर केले आहे. मानव संसाधन मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमात भाग घेण्यासाठी एका राज्यातून दुसºया राज्यात जाण्यासाठी तरुणांना विशेष सवलत देण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेसोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र गुप्ता यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना हिरडे म्हणाले की, नोकरीला असणाºया तरुणांचे दरमहा रुपये ५ हजारांपेक्षा कमी उत्पन्न असते़ त्यांना सेकंड / स्लीपर श्रेणीच्या मूलभूत भाड्यात (बेसिक भाड्यात) ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत एक विशेष बाब म्हणून मंजूर केली गेली आहे आणि एक उदाहरण म्हणून प्रस्तुत केली जाऊ नये. ही सवलत केवळ सामान्य गाडीच्या सेवांमध्ये दिली जाईल आणि ही सवलत विशेष गाड्या / कोच बुकिंगसाठी लागू नसणार आहे़ प्रवासाच्या स्थानकापासून ते उत्सवाच्या ठिकाणी सेवा देणाºया स्थानकापर्यंत परतीच्या प्रवासाची तिकिटे ३०० कि.मी.पेक्षा जास्त प्रवास करणाºया व्यक्तींना मेल एक्स्प्रेस भाड्यांच्या द्वितीय/ स्लीपर श्रेणी एक तरफा प्रवास भाड्यात सवलत दिली जाणार आहे.

 या सवलतीचा लाभ घेण्यासाठी विविध राज्यांच्या मानव संसाधन विकास संबंधित विभागाच्या सचिवांकडून आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे़ तथापि, सप्लेमेन्टरी शुल्क, आरक्षण शुल्क आणि इतर लागू शुल्क इत्यादी दोन्ही दिशासाठी पूर्ण आकारले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काय आहे 'एक भारत श्रेष्ठ भारत' अभियान...
- वार्षिक कार्यक्रम म्हणून विविध राज्यांना सांस्कृतिक ऐक्याच्या धाग्यात आणण्याच्या उद्देशाने 'एक भारत श्रेष्ठ भारत' अभियान राबविण्यात येत आहे़ या कार्यक्रमांतर्गत दरवर्षी एक राज्य आपली संस्कृती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी दुसरे राज्य निवडेल आणि दोन्ही राज्यांमधील संवाद वेगवेगळ्या मार्गांनी वाढविला जाणार आहे़ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा उपक्रम देशातील अंतर्गत सांस्कृतिक फरक दूर करून वेगवेगळ्या राज्यांतील लोकांमधील परस्परसंवादाला चालना देण्यासाठीचा हा उपक्रम आहे़ 

'एक भारत श्रेष्ठ भारत' अभियान हे देशाच्या सामर्थ्य आणि ऐक्यात महत्त्वाचे घटक बनणार आहे़ त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या उपक्रमाकरिता जाणाºया प्रत्येकाला रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे़ या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घेऊन रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे़
- प्रदीप हिरडे
वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर मंडल

Web Title: One step further to train culture and tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.