आता पांगरी अन्‌ वैरागमध्ये ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:21 AM2021-04-17T04:21:57+5:302021-04-17T04:21:57+5:30

बार्शी : शहरातील कोरोनाची वाढती संख्या पाहता वैराग येथे नकाते मंगल कार्यालयात डॉक्टर असोसिएशनच्या वतीने ४० ऑक्सिजन बेडचे ...

Now Kovid Hospital with oxygen bed in Pangri and Vairag | आता पांगरी अन्‌ वैरागमध्ये ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल

आता पांगरी अन्‌ वैरागमध्ये ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल

Next

बार्शी : शहरातील कोरोनाची वाढती संख्या पाहता वैराग येथे नकाते मंगल कार्यालयात डॉक्टर असोसिएशनच्या वतीने ४० ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल, तर पांगरी ग्रामीण रुग्णालयातही २० ऑक्सिजन बेड आणि बार्शीतील सुविधा हॉस्पिटलमध्ये ४० बेडचे, असे शंभर बेड वाढविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.

बार्शीत सर्वच हॉस्पिटलमधील बेड फुल झाले आहेत. बार्शीत लॉकडाऊनचे नियम नागरिक पाळत नाहीत, यावर बोलताना पंढरपूर निवडणूक होताच यंत्रणा रिकामी होईल आणि सोमवारपासून कडक अंमलबजावणी केली जाईल.

----

दुकाने उघडली जाणार नाहीत

शनिवार आणि रविवारी असलेला वीकेंड लॉकडाऊन सुरू असून, या दोन दिवसांत कोणतीही दुकाने उघडली जाणार नसल्याचे तहसीलदार सुनील शेरखाने यांनी सांगितले. यावेळी निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे, बार्शीचे मंडल अधिकारी उमेश डोईफोडे उपस्थित होते.

Web Title: Now Kovid Hospital with oxygen bed in Pangri and Vairag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.