आता सोलापुरात सामाजिक संस्थेच्या मदतीने उभारणार कोविड केअर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 05:49 PM2021-04-17T17:49:54+5:302021-04-17T17:50:01+5:30

सोलापूर - कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्या करिता पालिका प्रशासना सोबत आता स्थानिक सामाजिक संस्थेच्या मार्फत कोविड केअर सेंटर सुरू ...

Now Kovid Care Center will be set up in Solapur with the help of a social organization | आता सोलापुरात सामाजिक संस्थेच्या मदतीने उभारणार कोविड केअर सेंटर

आता सोलापुरात सामाजिक संस्थेच्या मदतीने उभारणार कोविड केअर सेंटर

Next

सोलापूर - कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्या करिता पालिका प्रशासना सोबत आता स्थानिक सामाजिक संस्थेच्या मार्फत कोविड केअर सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती महापालिका उपआयुक्त धनराज पांडे यांनी दिली.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्याअनुषंगाने शहरात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्या करिता महापालिका आणि जिल्ह्य प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना व प्रयत्न केले जात आहेत, तरीदेखील देखील करोना आटोक्‍यात येताना दिसत नाही, करोना सारख्या महामारीवर नियंत्रण मिळविण्या साठी पालिकेला लोकसहभाग अवश्यक आहे म्हणून पालिका प्रशासनाकडून करोना सारख्या महामारीवर प्रतिबंधात्मक उपाय करण्या करिता स्थानिक सामाजिक संस्थेला सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे , सेवाभाव वृत्तीने शहरातील काही सामाजिक संस्था संघटना कोविड केअर सेंटर चालू करून इच्छित असल्यास अशा संघटना संस्थेनी पालिकेशी संपर्क साधून परिसर परवानगी घ्यावी योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वात सह परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशीही माहिती पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. 

एखाद्या संस्थेने कोविड केअर सेंटर चालू करून करोनाच्या प्रादुर्भावावर प्राथमिक उपाचार करण्यास परवानगी देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात जैन सोशल गृप,जमाते उलेमा ,ग्रामीण पोलीस मुख्यालया आणि शहर पोलीस आयुक्तालया कडून कोविड केअर सेंटर उभारण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगीतले.

Web Title: Now Kovid Care Center will be set up in Solapur with the help of a social organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.